फरदीन खानचं पुनरागमन; रितेश आणि फरदीन तब्बल १४ ...

फरदीन खानचं पुनरागमन; रितेश आणि फरदीन तब्बल १४ वर्षांनी पुन्हा एकत्र (Fardeen khan comeback after 14years with Ritesh Deshmukh)

दिवंगत आभिनेता फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान आता तब्बल ११ वर्षांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पुरनरागमन करत आहे. फरदीनने ‘ओम जय जगदीश’ ‘हे बेबी’, ‘कुछ तुम कहो कुछ हम’, ‘नो एंट्री’ सारख्या अनेक सुपर हिट सिनेमातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. फरदीनने ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात नंतर कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही.

फरदीन खानला त्याच्या कॉमेडी टाइमिंगसाठी चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र अंमली पदार्थांच्या आहारी जाणं आणि वादात अडकून पडणं हे त्याच्या अपयशाचे कारण ठरल्याचं म्हटलं जात आहे.

Fardeen khan, Ritesh Deshmukh

मात्र आता पुन्हा तो ११ वर्षांनी प्रेक्षकांसमोर येणार आहे. फरदीन आणि रितेश देशमुख ‘हे बेबी’ नंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. रितेश देशमुखचा ‘विस्फोट’ या आगामी चित्रपटात फरदीन महत्वाची भूमिका साकारताना दिसेल. ‘विस्फोट’, हा २०१२ सालचा ऑस्कर नामांकित चित्रपट ‘रॉक पेपर सिझर’ या चित्रपटाचा रिमेक आहे.

रितेश आणि फरदीन तब्बल १४ वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत, याबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता म्हणाले, “फरदीन आणि रितेश सोबत काम करायला मी खुप उत्सुक आहे. हे प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप खास आहे, मी आणि माझी संपूर्ण टिम या प्रोजेक्टवर प्रचंड मेहनत घेत आहोत. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, महिन्या अखेर या चित्रपटाच्या प्रॉडक्शनचे काम सुरु करण्यात येईल.” ‘विस्फोट’ या चित्रपटाचे कथानक थरारक असून रितेश आणि फरदीन एकमेकांच्या विरोधात लढताना दिसतील.