शाहरुखला उघडाबंब पाहून फराह खानला उलट्या होत अस...

शाहरुखला उघडाबंब पाहून फराह खानला उलट्या होत असत (Farah Khan Used To Vomit On Seeing Shirtless Shahrukh Khan)

अभिनेता शाहरुख खान गेली 30 वर्षे फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. त्यामुळेच त्याला इंडस्ट्रीत किंग खान म्हणून ओळखले जाते. शाहरुखने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. इतकी वर्षे इंडस्ट्रीत काम करुनही त्याची जादू काही कमी झालेली नाही. शिवाय तो आताच्या काळातील अभिनेत्यांनाही फिटनेसच्या बाबतीत तगडी स्पर्धा देतो. शाहरुखला रोमान्सचा बादशहा म्हटले जाते.  चित्रपटात तो अनेकदा शर्टलेस सीन देतो. ते पाहून तरुणी घायाळ होत असतात. पण ओम शांती ओम चित्रपटातल्या एका सीनमध्ये शाहरुखला शर्टलेस पाहून निर्माती दिग्दर्शिका फराह खानला उलट्या झाल्या होत्या.

ओम शांती ओम चित्रपटातील दर्द ए डिस्को हे गाणं तुफान गाजलं. या गाण्यावर शाहरुखने खूप छान डान्स करत आपल्या सिक्स पॅकवाल्या शरीराचं प्रदर्शन केलं होतं. या संपूर्ण गाण्यावर त्याने शर्टलेस होऊन डान्स केला. त्यावेळी शाहरुखच्या बॉडीचे खूप कौतुक झाले होते. मात्र फराहची खूप चिडचिड झालेली.

कारण शाहरुख जेव्हा शर्टलेस होऊन कॅमेऱ्यासमोर यायचा तेव्हा फराहला उलट्या यायच्या. याबाबतचा खुलासा स्वत: फराहने एका मुलाखतीत केला होता. 

फराहने सांगितले, या गाण्याच्या शूटिंगवेळी जेव्हा शाहरुख शर्टलेस होऊन कॅमेऱ्यासमोर यायचा तेव्हा मला उलट्या सुरु  व्हायच्या कारण तेव्हा मी गरोदर होती. त्यावेळी मी पूर्णवेळ माझ्यासोबत एक बास्केट घेऊन बसायची. खरंतर शाहरुखची बॉडी हे त्यामागचं कारण नव्हतं. पण नेमकं शाहरुख समोर आला की तसं व्हायला सुरुवात व्हायची.  शाहरुख आणि फराहची मैत्री बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे.