तब्बूच्या वाढदिवसानिमित्त फराह खान हिने आयोजित ...

तब्बूच्या वाढदिवसानिमित्त फराह खान हिने आयोजित केलेल्या पायजामा पार्टीत तीन जिवलग मैत्रिणींची धमालमस्ती (Farah Khan Hosts Pyjama Party To Celebrate Tabu’s birthday, See Photos)

अभिनेत्री तब्बूचा वाढदिवस 4 नोव्हेंबरला होता. अभिनेत्रीच्या जिवलग मैत्रिणी शिल्पा शेट्टी आणि फराह खान यांनी तब्बूचा वाढदिवस खास करण्यासाठी पायजमा पार्टीचे आयोजन केले होते. चित्रपट निर्माते आणि कोरिओग्राफर फराह खान आणि शिल्पा शेट्टी यांनी या पायजमा पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर-चित्रपट निर्माती फराह खान यांनी तब्बूला तिच्या 52 व्या वाढदिवसानिमित्त खास ट्रीट देण्यासाठी पायजमा पार्टीचे आयोजन केले होते. फराह खानने सांगितले की, हा प्लान शिल्पाचा होता. शिल्पानेच तब्बूच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन आपल्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये केला होता.

 पण नंतर प्लॅनमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि तब्बूचा वाढदिवस पायजमा पार्टीमध्ये बदलण्यात आला. रेस्टॉरंटमध्ये पायजमा पार्टी साजरी करण्याऐवजी फराह खानच्या घरी करण्याचा निर्णय घेतला गेला.

तब्बूच्या पायजमा पार्टीत फक्त तिघीच जणी होत्या. तिघीही अगदी साध्या लूकमध्ये होत्या. त्यांनी आरामदायक नाईटवेअर आणि स्लीपर घातली होती. पायजमा पार्टीमध्ये केकसह स्वादिष्ट खाद्यपदार्थही होते.

हे फोटो शेअर करत फराह खानने कॅप्शनही लिहिले आहे. फराह खानच्या कॅप्शनला उत्तर देताना शिल्पाने कमेंट सेक्शनमध्ये एक कमेंटही लिहिली आहे. शिल्पाने लिहिले- “पार्टीनंतरही वचन नेहमी पूर्ण केली जातील. हॅप्पी बुरदाय्या टिम्पूओ मेरी जान.”

फराहने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, तीन लोकांची कंपनी. मला अशी पार्टी आवडते जी संध्याकाळी 7 वाजता सुरु होते आणि रात्री 10 वाजेपर्यंत संपते.

शिल्पा शेट्टीने तब्बूचा केक कापतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत तब्बू शांतपणे केक कापत आहे.

शिल्पाने त्या पार्टीबद्दल लिहिले की, तब्बू तुझा वाढदिवस साजरा करुन खूप छान वाटलं. फराह खानच्या घरी घालवलेली रात्र खूप छान आणि प्रेमळ होती. तिच्या घरी जेवण नेहमीच रात्री 9 च्या आधीच वाढले जाते. आणि 11 वाजायच्या आधीच बाय म्हटले जाते.