तब्बूने मै हूं ना या ब्लॉक बस्टर चित्रपटातील के...

तब्बूने मै हूं ना या ब्लॉक बस्टर चित्रपटातील केवळ 2 सेकंदाच्या रोलसाठी का दिला होता होकार, फराह खानने केला खुलासा(Farah Khan FINALLY Reveals Why Tabu Agreed To Do 2 Second Role In Main Hoon Na)

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा ‘मैं हूं ना’ हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले. आजही या चित्रपटातील गाणी चाहत्यांच्या तोंडपाठ आहे. पण या चित्रपटात तब्बू देखील होती हे फार कमी लोकांना माहित आहे. हो… तब्बू होती तेही केवळ 2 सेकंदाच्या भूमिकेसाठी. या गोष्टीचा खुलासा चित्रपटाची दिग्दर्शिका फराह खाननेच केला आहे.

‘मैं हूं ना’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात तब्बू सुद्धा होती, पण तब्बू कधी आली आणि कधी गेली, हे प्रेक्षकांना कळलेच नाही. आता इतक्या वर्षांनंतर या चित्रपटाची कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खाननेच याबाबतचा खुलासा केला.

मैं हूं ना हा फराह खानचा दिग्दर्शिका म्हणून पहिला चित्रपट होता. तब्बूबद्दल बोलताना फराहने सांगितले की, या चित्रपटात तब्बूची छोटी भूमिका होती. मेजर राम म्हणजेच शाहरुख खान शिकत असताना एक मुलगी कॉलेज कॅम्पसमध्ये येताना प्रेक्षकांना दिसते. तब्बूची ही एन्ट्री खूपच सरप्राइजिंग होती.

आता इतक्या वर्षांनंतर फराह खानने खुलासा केला की, चित्रपटात तब्बूची एंट्री कॅमिओच्या रुपात केली होती. चित्रपटाच्या कथेत तसे नव्हते. हा निर्णय अचानक घेण्यात आला.

लोकप्रिय इन्स्टाग्राम फॅशन अकाऊंट डाएट सब्याशी बोलताना फराह खानने खुलासा केला की, “तब्बू दार्जिलिंगमध्ये तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी होती, शूटिंगमधून थोडा वेळ काढून तब्बू माझ्या सेटवर मला भेटायला आलेली पण मी तिला खरेच त्या शॉटमध्ये घेतले आणि चित्रपटाच्या सीनमध्ये टाकले. मेकअप नसलेली, साध्या कपड्यातली तब्बू त्या चित्रपटात पाहायला मिळाली.

फराहने दिग्दर्शित केलेला ‘मैं हूं ना’ हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात शाहरुख खान, सुनील शेट्टी, झायेद खान, अमृता राव आणि सुष्मिता सेन यांनी काम केले होते.