कपिल शर्माच्या नव्या सोशल मीडिया पोस्टवर त्याच्...

कपिल शर्माच्या नव्या सोशल मीडिया पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी घेतली फिरकी…(Fans Hilariously React To Kapil Sharma’s ‘Hello friends, Juice Pee Lo’ Post)

विनोदी बादशहा अशी ओळख असलेल्या कपिल शर्माचे चाहते जगभर पसरले आहेत.  तो सध्या कॅनडा टूरवर असून वेगवेगळ्या शहरात जाऊन लाइव्ह शो द्वारे तिथल्या त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. कपिलने नुकतीच एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टला चाहते मजेशीर कमेंट करत आहेत तर काहीजण त्याची मजा घेत आहेत.

कपिल सध्या कॅनडा टूरवर असल्यामुळे सोशल मीडियावर तिथले फोटो शेअर करुन तो त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोत कपिल सरबत पित आहे. तो फोटो शेअर करत कपिलने त्याला  ‘हैलो फ्रेंड्स, ज्यूस पी लो…’असे कॅप्शन दिले आहे.

कपिलचे हे कॅप्शन व्लॉगर सोमवती महावरच्या मध्यंतरी व्हायरल झालेल्या व्हिडिओशी मिळते जुळते आहे. सोमवती महावरचे ‘’हैलो फ्रेंडस्, चाय पिलो’’ हे वाक्य प्रचंड व्हायरल झालेले. ते एक प्रकारे मीम म्हणून वापरले जात होते. कपिल शर्माची ही पोस्ट पाहून युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत.

एकाने त्या फोटोवर , मला आता सरबत प्यायची इच्छा झाली त्यामुळे मला पण आता सरबत ऑर्डर केले पाहिजे अशी कमेंट केली. तर दुसऱ्या युजरने कपिलला, तु ते सरबत आणून दे नाहीतर पाठवून तरी दे असे म्हटले, तर आणखी एकाने, धन्यवाद, ते तूच पी …अजून तुझे संपले नाही अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने कपिला कमेंटमध्ये सरबत पहिल्यांदा पितोयस का म्हणून फोटो काढलास असे विचारले आहे.

कपिलने त्याच्या कॅनडा टूरच्या शो मध्ये दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला आणि के.के. ला श्रद्धांजली देत त्यांची काही हिट गाणी गायली. या गाण्यामुळे लोकांच्या मनात केके आणि सिद्धू मूसेवालाच्या आठवणी जाग्या झाल्या.