काजोल दाखवायला गेली आपला निशाणा; चाहत्यांनी केल...

काजोल दाखवायला गेली आपला निशाणा; चाहत्यांनी केला पाणउतारा (Fans Disappointed to see Kajol’s new Stunt; Said-‘Don’t try at Home’)

करोनाच्या जास्त संसर्गामुळे लोक अतिशय त्रस्त झाले आहेत. त्याचा राग ते फिल्मी सिताऱ्यांवर काढताना दिसत आहेत. आजकाल फिल्मी कलाकार ज्या काही पोस्ट शेअर करतात, त्यावर लोक शेरेबाजी करत आहेत. अशाच एका पोस्टवर चाहत्यांच्या रागाला काजोल बळी पडली आहे.

काजोलने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यामध्ये ती एक सफरचंद हवेत उडविते आणि सुरीने वार करून त्याचे दोन तुकडे करते. काजोलच्या या स्टंटवरून चाहत्यांनी तिची निंदा केली आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

काजोलने सदर व्हिडिओ प्रसिद्ध करून ‘मूड’ एवढाच शब्द लिहिला आहे. चाहत्यांना तिची ही कृती अजिबात आवडलेली नाही. फ्रूट निंजा आणि निंजा काजोल असं म्हणून ते काजोलची खिल्ली उडवत आहेत. सफरचंद अशा रितीने वाया घालविण्याबाबत लोकांनी तिच्यावर टीका केली आहे. एक फॅन म्हणतो, “लोकांना इथे खायला मिळण्याची मारामार आहे. अशी पोस्ट टाकण्यापूर्वी जरा विचार कर.”

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम  

काजोलच्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर ती काही दिवसांपूर्वी ‘त्रिभंग’ या वेब चित्रपटात दिसली होती. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. काही हलके फुलके पोस्टस्‌ ती अधूनमधून शेअर करत असते. पण सफरचंदावर साधलेला तिचा हा निशाणा लोकांना काही पटला नाही. त्यांनी त्यावरून तिचा पाणउतारा केला आहे.