किशोर कुमारला ‘भारत रत्न’ द्या : चाहत्यांची माग...

किशोर कुमारला ‘भारत रत्न’ द्या : चाहत्यांची मागणी (Fans Demand To Honour Kishore Kumar With Tomost ‘Bharat Ratna’ Award)

सुप्रसिद्ध गायक व अभिनेता किशोरकुमार याला मरणोत्तर ‘भारत रत्न’ हा पुरस्कार देण्याची मागणी त्याच्या चाहत्यांनी केली आहे. काल ४ ऑगस्टला किशोरकुमारचा वाढदिवस होता. त्याचे औचित्य साधून त्याच्या प्रचंड चाहते असलेल्या लोकांनी २ हजारहून अधिक पोस्ट कार्डस्‌ पंतप्रधानांच्या कार्यालयात पाठविली आहेत. त्यामध्ये देशातील सर्वोच्च किताब ‘भारत रत्न’ त्याला देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे किशोरकुमारचे जन्मस्थान मध्य प्रदेशातील खांडवा या गावात आहे. ते सध्या भग्नावस्थेत असून त्याचे नूतनीकरण करून त्याला ऐतिहासिक वारशाचा दर्जा घ्यावा, अशी मागणी देखील चाहत्यांनी केली आहे.

किशोरकुमार प्रेरणा मंच, या संस्थेचे अध्यक्ष रणवीर सिंह चावला यांनी या मागण्यांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनीच प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. किशोरकुमारचे देशभर चाहते आहेत. त्याच्या नावाने जागोजागी फॅन क्लब चालवले जातात. रणवीर सिंग चावला यांच्या मागणीला लखनऊ, अहमदाबाद, मोरादाबाद, पतियाळा येथील फॅन-क्लबच्या चाहत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.