तेजस्विनी लोणारीला मिळाली ‘बिग बॉस मराठी ४ पब्ल...

तेजस्विनी लोणारीला मिळाली ‘बिग बॉस मराठी ४ पब्लिक विनर’ची ट्रॉफी; फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट (Fans Declared Tejaswini Lonari As Bigg Boss Marathi 4 Public Winner)

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही आश्चर्याचे धक्के मिळत आहेत. गेल्याच आठवड्यात तेजस्विनी लोणारीला हाताला झालेल्या दुखापतीमुळे घरातून बाहेर पडावं लागलं होतं. तेजस्विनी ही ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेतील सदस्यांपैकी एक होती. खेळ अर्धवट सोडत घरातून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकही नाखूश होते.

तेजस्विनीला ‘बिग बॉस’च्या घरात परत घेण्याची मागणी प्रेक्षकांकडून होत होती. तेजस्विनी व ‘बिग बॉस’च्या सोशल मीडियावरील पोस्टवर तशा कमेंटही प्रेक्षक करत होते. आता प्रेक्षकांनी त्यांच्या या लाडक्या स्पर्धकाला थेट ‘बिग बॉस’चा विजेताच घोषित केलं आहे. चाहत्यांनी ‘बिग बॉस मराठी ४’ ची ट्रॉफी तेजस्विनीच्या घरी पाठवली आहे. या टॉफ्रीवर ‘बिग बॉस मराठी ४ पब्लिक विनर’ असं लिहिलं आहे.

चाहत्यांकडून मिळणारे हे प्रेम पाहून तेजस्विनी भारावून गेली आहे. तिने फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. “माझ्यासाठी हाच विजय आहे. तुमचं निस्वार्थ प्रेम मी मिळवलं आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून प्रेम दिलं आहे. मला ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा पब्लिक विनर बनवल्याबद्दल तुमचे आभार मानते” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.