श्वेता तिवारी आहे दोन मुलांची आई, तरी चाहत्याला...

श्वेता तिवारी आहे दोन मुलांची आई, तरी चाहत्याला तिच्याशी लग्नाची घाई (Fan Fall in Love With Shweta Tiwari, Proposed Her For Marriage on Social Media)

सध्या टेलिव्हिजनवरील बऱ्याचशा नट्या या बॉलिवूडमधील अभिनेत्रींना टक्कर देताना दिसतात. यामध्ये आपला अभिनय आणि ग्लॅमर याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या श्वेता तिवारी (Shweta Tiwari)चा उल्लेख आवर्जून करावा लागेल. श्वेता तिच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फिटनेसची तारीफ करावी तेवढी थोडी. ४२ वर्षांची श्वेता दोन मुलांची आई आहे असं कोण म्हणेल?

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

तिच्या फिटनेसमुळे तिच्या वयाचा अंदाजच लावता येत नाही. तिच्या लूक आणि फिटनेसमुळे टेलिव्हिजनवरील इतर तरुण अभिनेत्रींनाही तिचा हेवा वाटत असणार. सोशल मीडियावर देखील तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहेत. वरचेवर ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिने तिचे शॉर्ट आउटफिटमधले फोटो शेअर केले होते, त्या फोटोंनी तर चाहत्यांना वेड लावले. त्यात ती अतिशय तरुण अन्‌ कमालीची सुंदर दिसत आहे.

तिचे चाहते तिची तोंड भरून प्रशंसा करत आहेत, तिच्या चाहत्यांपैकी एकाने तर तिला चक्क माझ्याशी लग्न करशील का? असं विचारलं आहे. वासीम अहमद काझी नावाच्या या नेटकऱ्याने सोशल मीडियावर फोटोंवर कमेंट्‌स करतानाच श्वेताला लग्नाची मागणी घातली आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

अर्थात्‌ श्वेता स्वतःला तरुण अन्‌ तंदुरुस्त ठेवण्यासाठी तितकीच मेहनतही घेते. व्यायाम आणि आहार याबाबत ती अतिशय स्ट्रिक्ट आहे. म्हणूनच तर आपल्या २१ वर्षांच्या मुलीला पलकला (Palak Tiwari) सौंदर्याच्या बाबतीत ती बरोबरीची टक्कर देताना दिसते.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

श्वेताच्या खाजगी जीवनाबद्दल बोलायचं तर तिची दोन लग्नं झाली आहेत. राजा चौधरीसोबत तिचं पहिलं लग्न झालं, त्यांना पलक ही मुलगी झाली. राजा चौधरीला घटस्फोट दिल्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं, त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. दुर्दैवाने तिचं दुसरं लग्नही फार काळ टिकलं नाही. आणि सध्या ती दोन्ही मुलांची सिंगल मदर असून आपल्या मुलांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत आहे. तिच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची खतरों के खिलाडीच्या ११ व्या पर्वामध्ये दिसली होती.