शाहरुख खानकडे चाहत्याने मागितला ओटीपी, अभिनेत्य...

शाहरुख खानकडे चाहत्याने मागितला ओटीपी, अभिनेत्याने दिले असे भन्नाट उत्तर(Fan Asked Shahrukh Khan For OTP, Amazing Answer Given By The Actor)

शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. याशिवाय बेशर्म रंग या गाण्यामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडला आहे.

या सर्व चर्चा आणि वादविवादादरम्यान शाहरुखने ट्विटरवर #AskSRK सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. चाहते शाहरुखच्या या सेशनची आतुरतेने वाटच पाहत असतात. या सेशनमध्ये शाहुरुख आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे देतो.

अशातच एकाने शाहरुखला विचारलं, ‘ सर, एक ओटीपी आला असेल, जरा मला सांगा.’यावर किंग खानने दिलेलं उत्तर फारच मजेशीर होते.चाहत्याला शाहरुख म्हणाला, ‘बेटा, मी इतका प्रसिद्ध आहे की मला OTP नाही येत. जेव्हा मी ऑर्डर देतो तेव्हा वेंडर्स मला थेट सामान पाठवतात. तुम्ही तुमचं बघून घ्या.’शाहरुखचे हे उत्तर खूप व्हायरल होत आहे.

या सेशनमध्ये आणखी एका चाहत्याने विचारलं की, तू कोणाकडून प्रेरणा घेतोस. यावर शाहरुखने उत्तर दिले,‘मी याआधीही हे सांगितलं आहे की मी सर्वसामान्य लोकांपासून प्रेरणा घेतो, यशस्वी लोकांकडून नाही. सामान्य असणंच खास आहे.’