‘डार्लिंग्स’ चित्रपटातून संतोष जुवे...

‘डार्लिंग्स’ चित्रपटातून संतोष जुवेकरचे हिंदी सिनेमात पदार्पण : स्वप्न सत्यात कसे उतरले याबाबत त्याचे कथन ( Famous Marathi Actor Santosh Juvekar Gets A Break In Hindi Film Industry Via ‘Darlings’ : Explains How His Dream Became True )

मराठी सिनेसृष्टीतला देखणा आणि हुशार अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. त्याने आतापर्यंत अनेक मालिका,  चित्रपट, वेब सिरीजमध्ये काम केले आहे. संतोष जुवेकर त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असायचा. सध्या तो आलिया भट्टच्या डार्लिंग्स् या चित्रपटामुळे चर्चेत आहे.  या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच निमित्ताने संतोषने एक पोस्ट शेअर केली आहे.

संतोषने या पोस्टमध्ये  त्याच्या अभिनयातील करीअरमधला  प्रवास कसा होता ते सांगितले आहे.

त्याने सांगितलं की, “वर्ष -१९९८. ठिकाण – दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावलाचे प्रॉडक्शन ऑफिस) मी ऑफिसच्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का? कुणाला भेटता येईल का? म्हणून गेटवर जाऊन एका सुरक्षारक्षकाला विचारतो. तर तो मला ओरडून “चल इथून निघ. कोणी बोलावलं तरच इथे यायचं. आता इथून जा” असं म्हणतो. आणि मी त्यावेळी थोडासा नाराज होऊन, थोडासा चिडून त्याला बोलतो “तू थांबच…एक दिवशी तूच माझ्यासाठी हा गेट उघडशील.”..आणि त्यानंतर त्याचे हे स्वप्न कसे सत्यात उतरले याबाबत संतोषने लिहिले आहे.

१९९८ ते २०२० दरम्यानचा संतोषचा प्रवास, त्याची कामासाठीची जिद्द ही खूपच अतुलनीय आहे. ज्या ठिकाणाहून हाकलले होते तिथूनच कामासाठी फोन येऊन अगदी अदबीने आदरातिथ्य केले जाते ही एखाद्या कलाकारासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी संतोषने देवाचे तसेच प्रेक्षकांचे ही आभार मागितले आहेत.

‘डार्लिंग्ज’चित्रपटामध्ये संतोष एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे. आलियासह शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीने या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.