‘मैंने पायल है छनकाई’गाणे नव्याने गायल्याने फाल...

‘मैंने पायल है छनकाई’गाणे नव्याने गायल्याने फाल्गुनी पाठकची नेहा कक्कडवर आगपाखड, लोकांनी केले ट्रोल (Falguni Pathak Upset With Neha Kakkar For Recreating Her Song ‘Maine Payal Hai Chhankai’)

नव्वदच्या दशकातील  मैने पायल है छनकाई हे लोकप्रिय गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. हे गाणे फाल्गुनी पाठकने आपल्या गोड आवाजात गायले होते. हे गाणे आजही तितकेच मधुर वाटते. पण आता ते नेहा कक्कडने रिक्रिएट केले आहे, ज्यामुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे.

नेहाचे हे गाणे काही दिवसांपूर्वी ‘ओ सजना’ शीर्षकाने यूट्यूबवर लाँच करण्यात आले. जे काहींना आवडले पण बहुतेक लोक या गाण्यामुळे संतापले आहेत.

अनेक युजर्सनी नेहाने हे गाणे आणि या गाण्याशी संबंधित आपल्या आठवणी उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे, लोक नेहाला गाणे सोडण्याचा सल्लाही देत ​​आहेत. तर काहीजणांचे म्हणणे आहे की, आधीच्या हिट फॉर्म्युल्यातून पैसे कमवण्याऐवजी तुम्ही काहीतरी स्वत:च असं का बनवत नाही.

एका चाहत्याने कमेंट केली की, नेहा मला तू आवडतेस पण हे गाणे? कृपया नवीन गाणी आणि गाण्याचे नवे बोल वापरून पहा. या गाण्यात काही अतिरिक्त बोल असले तरी ट्यून मात्र मूळ ठेवली आहे.

या गाण्यामुळे खुद्द दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकही नेहावर नाराज झाली आहे. फाल्गुनी यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतु एक शब्दही न बोलता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. फाल्गुनी यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांच्या सर्व कमेंटचे स्क्रीन शॉट्स आणि मीम्स शेअर केले आहेत, ज्यामध्ये नेहाची निंदा करण्यात आली आहे.

नेहाच्या या गाण्यात नेहाशिवाय प्रियांक शर्मा आणि धनश्री वर्मा दिसत आहेत.