आर्यन खानला बट्टा लावणारी महाभयंकर बातमी होतेय्...

आर्यन खानला बट्टा लावणारी महाभयंकर बातमी होतेय् व्हायरल (Fact Check : Viral Video Claims Aryan Khan Urinating Openly In An Airport)

एक व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये सांगण्यात येत आहे की, हा व्हिडिओ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आहे. तो नशेत चूर आहे. चेहरा अगदी स्पष्ट दिसत नसला तरी अंगकाठी आर्यन खानशी मिळतीजुळती आहे. अन्‌ हे कार्ट अमेरिकेतील विमानतळावर नशिल्या अवस्थेत लघवी करत आहे. त्याला आर्यन खान म्हणून लोक हा व्हिडिओ वेगाने शेअर आणि व्हायरल करत आहेत. त्यानं स्वतःच्या अन्‌ देशाच्या नावाला बट्टा लावला आहे, अशीही दूषणे त्यासोबत देत आहेत.

आर्यन खान मुंबई क्रुझ ड्रग्ज्‌ प्रकरणात बरेच दिवस तुरुंगात होता, हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तो देशाचं नाव खराब करतोय्‌, असं लोक म्हणताहेत.

पण यामागे खरं काय आहे? हा आर्यन खान आहे की आणखी कोणी? तर सांगायची गोष्ट म्हणजे हा आर्यन खान नसून हॉलिवूडच्या ‘ट्‌वायलाईट’ चित्रपटात काम केलेला कोवळा अभिनेता ब्रॉन्सन पेलेटियर आहे. सदर व्हिडिओ २०१२ सालचा आहे. जेव्हा त्याने नशेमध्ये लॉस एंजल्स एअरपोर्टवर सर्वांसमक्ष लघवी केली होती.

या नटाला आर्यन खान समजून लोक दोष देत आहेत. तर काही लोक म्हणताहेत की, बिचाऱ्या आर्यन खानला कां बदनाम करताय्‌?