सामान्यांच्या असामान्य कथा (Extraordinary Tales...

सामान्यांच्या असामान्य कथा (Extraordinary Tales Of Ordinary People In Pandemic)

करोनाच्या महाभयंकर साथीशी आपण सारे, जगातील सर्वजण झुंजत आलो आहोत. आता ही साथ काहीशी निवळत चालली असल्याचे चित्र दिसत असले, तरी ती जेव्हा ऐन बहरात होती, तेव्हाचे चित्र भीषण होते. भेसूर होते. जीवन बेसूर झाले होते. कित्येक घरातील माणसे हे जग सोडून गेली. त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान किती झाले, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण जे रोग होऊन बचावले, त्यांचेही तसेच नुकसान झाले. रोगाने दगावल्याचे व रोगमुक्त झालेल्यांचे दुःख समजून घेण्याचे एक मोठे कार्य डॉ. महेश अभ्यंकर व आरती भार्ज या लेखकांनी केले आणि मइमोझीलफ हे करोनाग्रस्तांच्या दुःखाला वाचा फोडणारे पुस्तक त्यांनी जन्मास घातले. मात्र या पुस्तकातील कथा निव्वळ विलापिका नसून जगण्याची नवी उमेद दाखविणार्‍या आहेत. हा रोग नवा असला तरी असे साथीचे रोग यापूर्वी आपल्याकडे येऊन गेलेत, त्यातून आपण सावरलो ; तसे यातून निश्‍चितपणे सावरू, नव्हे सावरलेच पाहिजे, असा संदेश देणारे हे अत्यंत प्रभावी पुस्तक आहे.
भावनिक स्थित्यंतरे
या साथीच्या रोगाने आपल्याला सक्तीचा स्वल्पविराम घ्यायला लावला होता. लॉकडाऊनमुळे सारे जग घरात बंदिस्त झाले होते. पण या संवेदनशील लेखकांनी मन व डोळे उघडे ठेवून लोकांशी संवाद साधला. किंवा त्यांचे अस्सल अनुभव कोणामार्फत ग्रहण केले असावेत. साथीच्या या काळातील भावनिक संक्रमणे आणि स्थित्यंतरे शब्दबध्द करण्याचा लेखकांनी विचार केला आणि रोहन प्रकाशनने तो पुस्तकरुपाने आपल्यासमोर आणला आहे.
मइमोझीलफ या पुस्तकात आपण अशा सामान्य लोकांच्या कथा वाचतो, ज्या खरोखरीच असामान्य आहेत. हे लोक सामान्य असले तरी त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे. प्रवाही भाषा आणि खिळवून ठेवणारी कथांची मांडणी ही यातील अनुभवांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सुविचारांची सुयोग्य पेरणी आहे. या सुविचारांमध्ये आशावाद ओतप्रोत भरलेला आहे. मुळात या लेखकद्वयांना या विषयास हात घालावासा वाटणे आणि त्यातून आशादायी विचार प्रसविणे, ही कौतुकाची गोष्ट आहे.


वाचनीय आणि चिंतनीय
मएका करोनाविराची रोजनिशीफ, मवारी पंढरीचीफ, मडिजिटलचे साम्राज्यफ या प्रकरणांमधील कथा वाचनीय आहेत. खरं म्हणजे सर्वच कथा वाचनीय आणि चिंतनीय आहेत. लेखकांनी म्हटल्याप्रमाणे, मयातील कथा केवळ साथीच्या रोगाच्या काळातील आहेत, अशा नव्हे तर जीवनात येणार्‍या कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याचे सामर्थ्य देणार्‍या आहेतफ, याचा प्रत्यय देणार्‍या आहेत.
डॉ. महेश अभ्यंकर हे वैद्यकीय सल्लागार आणि औषधनिर्माण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये ते धोरणात्मक आणि व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तर आरती भार्ज या जीवन प्रशिक्षक आणि न्युरो लिंग्विस्टीक प्रोग्रामिंग मास्टर प्रॅक्टीशनर आहेत. या प्रथितयश लेखकांच्या मनोबल उंचावणार्‍या कथांना प्रकाशकाने अतिशय सुबक आकारात पेश केलं आहे.
इमोझील
लेखक – डॉ. महेश अभ्यंकर
आरती भार्ज
प्रकाशक – रोहन प्रकाशन, पुणे
पाने – 194
मूल्य – रुपये 250

  • दीपक खेडकर