मुंबईतील गडगंज श्रीमंतांची सर्वाधिक महागडी घरं ...

मुंबईतील गडगंज श्रीमंतांची सर्वाधिक महागडी घरं (Most Expensive Houses of Famous People In Mumbai)

मुंबईला स्वप्ननगरी असं म्हणतात. येथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न साकार होतंच. या शहरात
आपलं छोटंसं का होईना पण स्वतःचं घर असलेल्या व्यक्ती स्वतःला अतिशय श्रीमंत समजतात.
असो, पण आपण फिल्मी कलाकारांनी सजलेल्या या शहरातील मोठ्या प्रतिष्ठित लोकांच्या
महागड्या घरांबद्दल जाणून घेऊया. पाहुया मुंबईतील १० सर्वाधिक महागड्या घरांचे मालक कोण
आहेत?

अमिताभ बच्चन
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील जलसा बंगल्याची किंमत १६० कोटीच्या जवळपास
आहे.

शाहरुख खान
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान बांद्रा येथे राहतो. त्याच्या घराचं नाव मन्नत आहे. या
मन्नतची किंमत १३० कोटी रुपये आहे.

आमिर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान काही वर्षांपूर्वी बांद्राला समुद्रकिनारी असलेल्या
फिडा या बिल्डिंगमध्ये राहत होता. येथे तो भाड्याने राहत होता. असं म्हणतात की, त्या फ्लॅटचं
महिन्याचं भाडं १० लाख रुपये इतकं होतं. आता आमिरने येथून शिफ्ट केले आहे.

रतन टाटा
उद्योगपती रतन टाटा यांनी २०१५ मध्ये मुंबईत एक आलिशान प्रॉपर्टी विकत घेतली. रियल
इस्टेटशी संबंधित सूत्रांनुसार त्यांच्या या घराची किंमत १५० कोटींच्या जवळपास आहे.

मुकेश अंबानी
देशातील गडगंज श्रीमंतांपैकी एक मुकेश अंबानी यांची मुंबईत २७ मजल्यांची इमारत आहे.
अंटिलिया असं या इमारतीचं नाव असून आपल्या कुटुंबीयांसह ते तेथे राहतात. या इमारतीमध्ये
त्यांचं खाजगी हेलिपॅडही आहे. हा आलिशान निवारा बांधण्याकरिता १२ हजार कोटीच्या जवळपास
खर्च त्यांनी केला आहे.

अनिल अंबानी
मुकेश अंबानींचा भाऊ अनिल अंबानी यांचं मुंबईतील पाली हिल परिसरामध्ये घर आहे. त्यांच्या
घराचं काम सुरू असलं तरी, त्यांच्याही घराची किंमत ५ हजार कोटींच्या जवळपास असल्याचं
म्हटलं जातं.

आनंद पिरामल आणि ईशा पिरामल
आनंद पिरामल आणि ईशा पिरामल यांना त्यांचं गुलिटा हे घर लग्नात भेट म्हणून मिळालं आहे.
आनंदच्या वडिलांनी आपल्या सुनेसाठी ही भेट दिली आहे. मुंबईत वरळी येथे असलेल्या या पाच
मजली इमारतीची किंमतही ४५० कोटीच्या जवळपास आहे.

राजेश खन्ना
राजेश खन्नाने मुंबईमध्ये ३२१.५ लाख रुपये मोजून बंगला विकत घेतला होता.

कुमार मंगलम बिर्ला
कुमार मंगलम बिर्ला यांचा मुंबईतील समुद्रकिनारी असलेला बंगला जाटिया, हा देखील ४५०
कोटीच्या जवळपास आहे.

सायरस पुनावाला
पुण्याचे व्यापारी सायरस पुनावाला यांनी २०१५ मध्ये मुंबईतील ब्रीच कँडी येथील लिंकन हाऊस
७५० कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. मुंबईतील जमीनजुमल्याबाबतचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठ्ठा सौदा होता, असं म्हणतात. लिंकन हाऊस म्हणून ओळखला जाणारा हा बंगला अमेरिकन वकिलातीकडे होता.