१९ वर्षांनी येत असलेला दुर्मिळ योग (Exclusive O...

१९ वर्षांनी येत असलेला दुर्मिळ योग (Exclusive Opportunity After 19 Years)

यंदाही करोनामुळे मराठी नव्या वर्षाच्या स्वागताला नागरिक स्वागतयात्रा काढू शकणार नाहीत. मात्र नव्या वर्षाचा उत्साह यंदा कैक पटीने अधिक असेल. चांद्रवर्ष आणि चांद्र-सौरवर्ष हे १३ आणि १४ एप्रिलच्या दरम्यान येत आहेत. त्यामुळे मराठी वर्षाचीच नव्हे तर, कन्नड, तेलुगु, सिंधी, मणिपुरी, मल्याळी, तमिळ, उडिया, बांगला, पंजाबी, आसामी आणि उत्तर भारतीय नवी वर्षही १३ व १४ एप्रिलला सुरू होत आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक समाजाची, भाषकांची, प्रांतांचे नवे वर्ष सुरू होण्याचा योग १९ वर्षांनी येत आहे. वेसाक सणही याच दरम्यान येत आहे. हा सण श्रीलंका आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये साजरा केला जातो.

अशी बोली… असे नववर्ष
मराठी : गुढीपाडवा
गुजराती : पाडवा
तेलुगु, कन्नड : उगादी
सिंधी : चेती चांद
मणिपुरी : चेईराओबा
तमिळ : पुथ्थांडू
मल्याळी : विषु
बांगला : नोबोबोर्षो
आसामी : बिहु
पंजाबी (हिंदू, शीख) : बैसाखी
उडिया : पनसंक्रात
बौद्ध : वेसाक
त्रिपुरा बिजू
झारखंड सारहुल