‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेतील लग्नात...

‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेतील लग्नात लक्षणीय मंगळसूत्र (Exclusive Mangalsutra Design In The Wedding Ceremony Of Marathi Serial ‘Tu Saubhagyavati Ho’)

सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. सध्या या मालिकेत लगीन घाई बघायला मिळत आहे. या संपूर्ण सप्ताहात मालिकेतील ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे. आणि या लग्नात सर्वात लक्षणीय असणार आहे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र.

ऐश्वर्याच्या या ‘लक्ष्मी मंगळसूत्राची’ सगळीकडे चर्चा होत आहे. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे, असं म्हटलं जात आहे. जाधव कुटुंब हे गावातील मोठं प्रस्थ असल्याने लग्नाचा थाट देखील तसाच असणार आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे.

ऐश्वर्याचं हे लग्न चारचौघींसारखं नाही तर आगळंवेगळं आहे. वयाच्या, सामाजिक दर्जाच्या एकंदर सीमा ओलांडून हे लग्न होतंय. सूर्यभान हा विधुर आहे आणि त्याला ३ मुलं आहेत. तो आपल्या पहिल्या पत्नीची जागा कोणालाच देऊ शकत नाही, असं त्याच ठाम मत आहे. असं असताना समंजस पण अल्लड ऐश्वर्या, सूर्यभानची बायको, बायजींची सून आणि सूर्यभानच्या मुलांची आई बनून जाधवांच्या वाड्यात येईल तेव्हा नेमकं काय होईल? हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.