ॐ काराचे अद्भुत फायदे (Exclusive Benefits Of Om...

ॐ काराचे अद्भुत फायदे (Exclusive Benefits Of Omkar Chanting)

ॐ तीन अक्षरांनी बनला आहे. पहिलं अ ज्याचा अर्थ आहे उत्पन्न होणे. दुसरं अक्षर उ म्हणजे विकास आणि तिसरं अक्षर हम म्हणजे मौन अर्थात ब्रह्मामध्ये विलीन होऊन जाणे. ॐ हा अस्तित्वाचा आवाज असल्याचे म्हटले जाते आणि याचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. ओमच्या उच्चारणामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

ॐ काराचे अद्भुत फायदे, Benefits Of Omkar Chanting

– शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात.
– व्होकल कॉर्ड आणि घश्याच्या स्नायूंना बळकटी मिळते. हे विशेषतः वाढत्या वयात आणखी फायदेशीर आहे.
– ॐ च्या नियमित उच्चारणाने जी कंपने निर्माण होतात, त्याचा व्होकल कॉर्ड आणि सायनसवर देखील परिणाम होतो.
– यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि पचन सुधारते.
– थकवा घालविण्याकरिता काही वेळ ओमचा उच्चार करणे हा उत्तम उपाय आहे.
– काही व्यक्तींना असाही अनुभव आला आहे की, ओमचा जप केल्याने त्यांचे वजन नियंत्रणात राहिले आहे. ओमच्या उच्चारणाची स्पंदने संपूर्ण शरीरावर परिणाम करतात आणि वाढलेले वजन कमी करतात.
– थायरॉइड नियंत्रित ठेवतो.
– ओमच्या उच्चारणाने पचनक्रिया सुधारते.
– मरगळ दूर करून उर्जा देतो. प्राणायाम करताना ओमचा जप केल्यास हे फुप्फुसांस मजबूत बनवतात. यामुळे छान झोप लागते.
– हाडं मजबूत होतात, कारण ओमकाराची पुनरावृत्ती केल्याने शरीरात विशिष्ट प्रकारची कंपनं तयार होतात. या व्यतिरिक्त यामुळे मानसिक शांतता मिळते.

ॐ काराचे अद्भुत फायदे, Benefits Of Omkar Chanting

अशा सर्वच कारणांमुळे सर्व मंत्रांमध्ये ॐ चं महत्त्व जास्त आहे. अनेक प्रकारचे क्लिनिकल रिसर्च देखील असंच दर्शवितात की ओमच्या जपामुळे मेंदू आणि शरीरात होणार्‍या कंपनांचा खूप सकारात्मक परिणाम होतो.