पायल रोहतगीच्या आधीच्या प्रियकराने असे कुकर्म क...

पायल रोहतगीच्या आधीच्या प्रियकराने असे कुकर्म केले होते की, ती आत्महत्या करायला निघाली होती (Ex-Boyfriend Did Such An Act With Payal Rohatgi, That The Actress Was Forced To Commit Suicide)

पायल रोहतगीने आपल्या प्रदीर्घ काळ मैत्रीत असलेल्या संग्राम सिंह या प्रियकराशी नुकतेच धुमधडाक्यात लग्न केले. मात्र पायलच्या जीवनात आलेला हा पहिलाच मित्र नव्हे. यापूर्वी तिचे प्रेमप्रकरण घडले होते. मात्र आधीच्या प्रियकरासोबत तिचा अनुभव फारच वाईट होता. तो तिच्याशी इतका वाईट वागला होता की, पायलचे जीवन त्याने विस्कटून टाकले होते.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

पायलचा हा तथाकथित बॉयफ्रेंड होता राहुल महाजन. त्याने तिला मारझोड केली होती. पायलचे डोके दरवाजावर आपटले होते. ही दुर्दैवी घटना स्वतः पायलने ‘लॉक अप’ कार्यक्रमात सांगितली होती. या मारहाणीने ती इतकी खचली होती की, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर ती दारूच्या आहारी पण गेली होती.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

याच कार्यक्रमात पायलने उघडपणे हेही सांगितलं की, तिने आणि संग्रामने गेल्या ४-५ वर्षांपासून मूल होण्यासाठी प्रयत्न केले, पण तिला दिवस राहू शकले नाहीत. तेव्हा तिने संग्रामला अन्य कोणाशी लग्न करण्याची मुभा दिली होती. पण संग्रामने ते न ऐकता, तिच्याशीच लग्न केलं. हे सांगताना पायलच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ‘सर्व्हायवर इंडिया’च्या सेटवर पायल रोहतगी आणि संग्राम सिंह एकमेकांना भेटले. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ८ वर्षांपूर्वी या दोघांचा साखरपुडा अहमदाबादला झाला होता. कंगणा रणावतच्या ‘लॉक अप’ या कार्यक्रमात संग्रामने, पायलला मागणी घातली व लग्नाचे सुतोवाच केले होते.

(सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)