आमच्या संसारात सर्व काही आलबेल…घटस्फोटाच्...

आमच्या संसारात सर्व काही आलबेल…घटस्फोटाच्या चर्चांवर सिद्धार्थ जाधवने केला खुलासा(Every thing Is Ok On Our Married Life : Siddharth Jadhav Clears About The Fake News Of Their Divorce)

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या अतरंगी स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने मराठी चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केले आहे.  सिद्धार्थ जाधव आता जरी एक सुपरस्टार असला तरी त्याने त्याचे नाव शून्यातून कमावले. त्याच्या दिसण्यावरुन त्याला कधीच चांगले काम मिळायचे नाही. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सिद्धार्थ वर आला आहे. पण या सर्व कठीण परिस्थितीत त्याच्या पाठीशी आपली पत्नी तृप्ती जाधव खंबीर उभी राहिल्याचे सिद्धार्थने अनेक मुलाखतीत सांगितले आहे. पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. गेले काही दिवस सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले होते.

या सर्व चर्चांना कंटाळून सिद्धार्थने उत्तर दिले. एका मुलाखतीत सिद्धार्थने सांगितले की, ‘’या सर्व अफवा कुठून पसरवल्या जात आहेत हेच मला कळत नाही. आम्ही सोबत आहोत आणि सर्वकाही ठिक आहे.’’ तुम्ही दोघं गेली दोन वर्षे वेगळे राहत आहात का ? या प्रश्नावर सिद्धार्थने,’’ सब कुछ ठिक है ‘’असे उत्तर देऊन पुढे काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि तृप्ती खूप अॅक्टिव्ह असतात पण गेली दोन वर्षे दोघांनीही एकमेकांसोबत एकही पोस्ट टाकलेली नाही. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावरुन देखील त्यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे. तसेच तृप्तीने तिचे इन्स्टाग्रामवरील जाधव हे आडनाव काढून तिथे माहेरचे अक्कलवार हे आडनाव लावलं. या सर्व गोष्टींमुळे सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आले.

तृप्ती कॉलेजमध्ये असताना एका नाटकाच्या ऑडिशनला गेलेली तेव्हा तिथे तिची आणि सिद्धार्थची ओळख झाली होती. तृप्ती ते नाटक करु शकणार नव्हती हे समजल्यावर पुढे तिची भेट होईल की नाही या भीतीने सिद्धार्थने तृप्तीला प्रभादेवी स्टेशनवर लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी तृप्तीने नकार दिला मात्र पुढे जेव्हा त्यांची मैत्री घट्ट होत गेली तशी तिने लग्नाला होकार दिला. या दोघांनी 2007 मध्ये लग्न केले. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.