चिरतरुण आवाजाची गायिका आशा भोसले यांना महाराष्ट...

चिरतरुण आवाजाची गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर (Evergreen Singer Asha Bhosale Gains A Big Honour)

चिरतरुण आवाजाची ख्यातनाम गायिका आशा भोसलेजी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. या निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी  ट्वीटवर आशाताईंचे अभिनंदन केले आहे.
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चिरतरुण आवाजाचं दैवी देणं आशाताईंना लाभलं आहे. आशाताईंच्या गळ्याला त्याज्य असं कुठलंच गाणं, कुठलाच संगीत-प्रकार नाही असं म्हटलं जातं ते खोटं नाही.

आशाजींना यापूर्वीही अनेक सन्माननीय पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आता त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाला असून १० लाख रोख व प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे . १९९६ सालापासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)