वय झाले बेचाळीस, तरी श्वेता राखून आहे फिटनेस (E...

वय झाले बेचाळीस, तरी श्वेता राखून आहे फिटनेस (Even At The Age Of 42, Shweta Tiwari Maintains Her Fitness)

टी. व्ही. क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीने आपला फिटनेस आणि सौंदर्य याबाबत अधिकच नाव कमावले आहे. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेपासून तिनं आपले करिअर सुरू केलं. त्यानंतर तिने बऱ्याच मालिका गाजवल्या. ‘बिग बॉस सीजन ४’ मधे भाग घेऊन ती विजेती ठरली होती. ही श्वेता आता ४२ वर्षांची आहे, तरीपण ती इतकी फिट आणि सुंदर दिसते की, हल्लीच्या तरुणींनी तिच्याकडून धडा घेतला पाहिजे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

श्वेताने दोन लग्नं केलीत. पण काही ना काही कारणांनी ती टिकली नाहीत. दोन्ही लग्नामधून तिला एकेक मूल झालं. पहिल्या नवऱ्यापासून तिला मुलगी झाली, तिचं नाव पलक. दुसऱ्या नवऱ्यापासून तिला मुलगा झालाय्‌. दोन्ही मुलांना ती आपल्या जवळ ठेवून आहे. तिची मुलगी पलक तर आता चित्रसृष्टीत पदार्पण करण्याच्या बेतात आहे. पण श्वेताचा फिटनेस आणि रुप भल्याभल्यांना चकित करणारं आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सोशल मीडियावर तर असे बरेच युजर्स आहेत, जे श्वेताची तरुण मुलगी पलक पेक्षा, तिच्या आईला म्हणजे श्वेताला अधिक फिट आणि सुंदर मानतात. त्यामुळे वयाच्या ४२ व्या वर्षी देखील श्वेता ज्या पद्धतीने स्वतःची देहयष्टी राखून आहे, ते सर्व तरुणींसाठी अनुकरणीय आहे.