आपल्या तान्या बाळाला अंगावर पाजत असल्याचे फोटो ...

आपल्या तान्या बाळाला अंगावर पाजत असल्याचे फोटो एव्हलिन शर्माने प्रसिद्ध केले : चाहत्यांनी त्यावर प्रेम व्यक्त केले (Evelyn Sharma Shares Pics While Breast feeding Daughter : Netizens Shower Love On This Moment)

अभिनेत्री  एव्हलिन शर्माने सध्या कामात ब्रेक घेतला असून ती आपल्या तान्ह्या मुलीच्या संगोपनात व्यस्त आहे. लहान मुलीचे फोटो ती इन्स्टाग्राम वर शेअर करत असते. आता तिने आपल्या मुलीस अंगावर दूध पाजत असल्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यावर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.

मुलीला अंगावर पाजत असल्याच्या या फोटोंमध्ये एव्हलिन स्मितहास्य देते आहे. मायलेकींच्या या सेल्फीची लोक तारीफ करत आहेत.

या पोस्टद्वारे एव्हलिन आपल्या मातृत्वाचा प्रवास दर्शवित आहे. लोकांना तो आवडला असून फोटोची प्रशंसा करत लहानग्या मुलीच्या गोडव्याची पण तारीफ करत आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात एव्हलिनने तुषान भिंडीशी लग्न केलं होतं. तर नोव्हेंबर महिन्यात ती आई बनली आहे.  एवा , असं तिनं आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. एवा हे लॅटिन नाव असून त्याचा अर्थ चिमणी, पाणी किंवा जीवन असा होतो.

मॉडेल व अभिनेत्री असलेल्या एव्हलिन शर्माने ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ‘ये जवानी है दिवानी’ व अनेक चित्रपटातून ती दिसली होती. मात्र बॉलिवूडमध्ये ती आपली खास छाप पाडू शकली नाही. सध्या तरी ती आपला संसार आणि मातृत्व यामध्ये रमली आहे.