युरोपियन चित्रपट महोत्सवात, सत्यजित राय यांना ...

युरोपियन चित्रपट महोत्सवात, सत्यजित राय यांना मानवंदना (European Film Festival To Pay Homage To Satyajit Ray)

आभासी पद्धतीने साजरा होणाऱ्या युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवलमध्ये वास्तवदर्शी चित्रपटाचे जनक , दिग्दर्शक सत्यजित राय  यांना मानवंदना देण्यात येणार आहे. रायबाबू यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे, त्या निमित्ताने त्यांचा ‘पथेर पांचाली ‘ हा चित्रपट दाखविण्यात येऊन त्यावर चर्चासत्र घेण्यात येईल.

१ नोव्हेंबर पासून युरोपियन चित्रपटांचा हा महोत्सव सुरु होत असून त्यामध्ये ३७ भाषेतील ६० चित्रपट दाखविण्यात येतील. समकालीन भारतीय चित्रपटांचा विभाग या महिनाभर चालणाऱ्या महोत्सवात असून त्यामध्ये हिंदी, मराठी, मल्याळम आणि बंगाली या चार भाषांमधील सहा चित्रपट दाखविण्यात येतील .

मनोरंजनात्मक तसेच शैक्षणिक आशय असलेले, युरोपियन देशातील मान्यवर दिग्दर्शकांचे अभिजात चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत.