इशा गुप्ताने शेअर केला ब्रालेस फोटो, फोटो पाहून...

इशा गुप्ताने शेअर केला ब्रालेस फोटो, फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप (Esha Gupta Shares Her Braless Photo: Amazed Fans Are Showering Comment)

अभिनेत्री इशा गुप्ता अनेकदा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा इशाने असा एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे ज्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. या फोटोत इशाने पीच रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यानंतर तिने ब्रालेस होऊन फोटोशूट केले. आणि तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. इशाचा ड्रेस खूपच तोकडा आहे.  

या लेटेस्ट फोटोत इशा ब्रालेस होऊन कॅमेऱ्यासमोर मादक पोज् देत आहे. या फोटोत तिचा चेहरा पूर्णपणे दिसत नसून पाठीमागून फोटो काढल्यामुळे एक बाजूचा चेहरा दिसत आहे. तसेच ती ब्रालेस होऊन तिची पाठ दाखवत आहे.

पीच रंगाच्या ड्रेसवर इशा खूपच हॉट दिसत आहे. हा फोटो इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून त्यासोबत लाइफ इज पीच असे कॅप्शन दिले आहे. इशाने तिचा हा हॉट फोटो शेअर करताच तिच्या चाहत्यांनी लगेच कमेंट करायला सुरुवात केली. तिच्या फोटोला अनेकजण ह्रदयाचा तसेच फायरवाल्या इमोजी कमेंट करत आहेत. इशाची बोल्ड फोटो पोस्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिने अनेकदा तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले होते. तेव्हा सुद्धा तिच्या चाहत्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला होता.

इशाने आश्रम ३ या सीरीजमध्ये सोनिया हे पात्र साकारले आहे. या सीरीजमध्ये तिने अभिनेता बॉबी देओलसोबत खूप इंटीमेट सीन्स दिले आहेत. सध्या तिच्या या बोल्ड सीन्सची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर होत आहे.