शय्यासोबत करण्यासाठी नकार दिल्याने चित्रपटातून ...

शय्यासोबत करण्यासाठी नकार दिल्याने चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी : इशा गुप्ताचा सनसनाटी आरोप (Esha Gupta Blasts : A Producer With Him She Refused To Compromise)

‘जन्नत २’ या चित्रपटातून नावारूपास आलेली इशा गुप्ता किती बिनधास्त आणि बोल्ड आहे, ते आपण गेल्याच आठवड्यात अनुभवलं. टॉपलेस पोस्ट शेअर करून तीन चाहत्यांची निंदा ओढवून घेतली होती. या निंदकांना तिनं प्रतिप्रश्न केला होता की , एखाद्या पुरुष नटाने असं धाडस केलं असतं तर तुम्हाला काही वाटलं नसतं नं ?…

आता ह्याच ईशानं फिल्म उद्योगातील कास्टिंग काऊचं, अर्थात नाट्याना  करावी लागणारी शाररिक तडजोड बाबत सनसनाटी विधान केलं  आहे. ‘बबल’ ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते की , सुरुवातीला मी माझ्या मेकअप आर्टिस्ट सोबत रूम शेअर करत होते. कारण मला येथील माणसांच्या मनातील राक्षसाची भीती वाटायची. आम्हाला कामाची गरज आहे, मग आमच्या अंगावर हात टाकला तरी चालण्यासारखं आहे, अशी इथल्या काही लोकांची मनोवृत्ती झालेली आहे.
दोन वेळा आपल्यावर हात टाकण्याचा प्रयत्न झाला आहे, असे ईशाने सांगितले. निर्मात्या सोबत शय्यासोबत करण्यास मी नकार दिला म्हणून चित्रपटातून काढून टाकलं होतं . ४-५ दिवसाचं शूटिंग झालं होतं तरी त्यांनी मला काढलं …. ही मुलगी काही तडजोड करणार नाही, असं बोलत मला कामच देत नव्हते. 

हीच माणसे सिताऱ्यांच्या मुलींशी असे वाईट वागणार नाहीत कारण फिल्मी पार्श्वभूमी असलेल्या मुलींशी असं वागलं तर त्यांचे माता-पिता आपली धुलाई करतील, हे ते जाणून असतात.