अंगप्रदर्शनाच्या स्पर्धेत एरिका फर्नांडिसचा सहभ...

अंगप्रदर्शनाच्या स्पर्धेत एरिका फर्नांडिसचा सहभाग; दिले बिकिनीतील हॉट फोटोज् (Erica Fernandes Shares Hot Bikini Photos From Maldives Vacation, See Her Glamours Look In Viral Photos)

टेलिव्हिजनची लोकप्रिय कलाकार एरिका फर्नांडिसचे बिकिनीतील हॉट फोटोज्‌ सोशल मीडियाचं तापमानही गरम करत आहेत. तिच्या या लेटेस्ट फोटोंमधून अंगप्रदर्शनाच्या स्पर्धेतील तिचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.
बहुतेक मालदीव हे बॉलिवू्‌ड आणि टी.व्ही.वरील कलाकार यांचे आवडते पर्यटनस्थळ बनत चालले आहे. रोजच्या रोज कोणत्या कोणत्या सेलिब्रेटीजकडून मालदीव येथील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. शिल्पा शेट्टी, करण सिंह ग्रोवर, सारा खान, तापसी पन्नू आदी कलाकार आपल्या कामातून ब्रेक घेऊन मालदीवला जाऊन आलेले आपण याआधी फोटोंत पाहिले आहे. एरिका फर्नांडिस देखील सुट्टी घालविण्याकरिता मालदीवला गेली होती.

मालदीवला सुट्टीची मजा घेऊन एरिका घरी परत आली आहे. येथे आल्यानंतर तिने सोशल मीडियावर स्वतःचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

एरिकाचा सगळ्यात स्टनिंग क्लिक असलेला हा फोटो आहे.

ग्लॅमरस आणि हॉट फोटोंबरोबरच एरिका फर्नांडीजचा सडसडीत बांधाही नजरेतून सुटत नाही. मल्टी कलरच्या स्विमिंग ड्रेसप्रमाणेच तिची फिगरही एकदम फिट दिसत आहे. सोबतच तिने चंकी ब्रेसलेट, इअररिंग्स आणि हेअरबँडही घातला आहे.

बीचवर काय तयारीत जायचं हे एरिकाच्या फोटोंवरून लक्षात घ्या. बीचसाठीचा परफेक्ट लूक तिच्याकडे आहे. इतरही वेगवेगळ्या ठिकाणच्या पोजेस फोटोत दिसत आहेत.

थाई हायस्लिट स्कर्ट आणि स्ट्रैपलेस क्रॉप टॉपमधील एरिकाचे व्वा! क्या कहनें…!

ब्लू गाउन घालून मधोमध बसलेली एरिका मालदीव येथील तापमान वाढवत आहे.

एरिकाने मालदीव येथील बिकिनीतील जे फोटो शेअर केले आहेत, त्या फोटोंना फॅन्सकडून बऱ्याच कमेंट्‌स आणि लाईक्स मिळत आहेत.

या फोटोत एरिका निळ्याशार समुद्रात झोपाळ्यावर स्वतःच्याच विश्वात रंगून गेलेली दिसत आहे.

एरिकाला झोके घेताना पाहून, कोणालाही या सुंदर बीचवर झोके घेण्याची इच्छा न होईल तर नवलच…

एरिकाला येथील समुद्राने फारच वेड लावलेले आहे.

येथील मौजमजेचे फोटो शेअर करताना ती कॅप्शनमध्ये स्वतःला – गोल्डन गर्ल असं म्हणतेय.

या कॅप्शनवरून लक्षात येतं की, ती स्वतःच स्वतःच्या या फोटोंवर किती फिदा आहे. मग चाहत्यांचं काय होत असेल?

एरिका ही आज टेलिव्हिजनवरील नावाजलेली अभिनेत्री असली तरी मॉडेल म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. मॉडेलिंगबरोबरच एरिकाने अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. या व्यतिरिक्त एरिकाने तमिळ चित्रपटातही काम केले आहे.

एरिकाने २०१६ सालामध्ये ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. या मालिकेतील नायक शेहर शेखसोबत एरिकाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांनी खूपच पसंत केली. त्यानंतर ती ‘कसोटी जिन्दगी की -२’ मध्ये प्रेरणा शर्माच्या रोलमध्ये दिसली. एरिकाने अजूनपर्यंत दोनच मालिका केल्या आहेत. परंतु या दोनच मालिकांतून तिने लाखो चाहत्यांचे मन जिंकले आहे. आता तर ती सोशल मीडियावर एक सेलिब्रेटी बनली आहे.