इंटरनेटचे तापमान वाढविणारे एरिका फर्नांडिसचे नि...

इंटरनेटचे तापमान वाढविणारे एरिका फर्नांडिसचे निळ्या बिकीनीतील हॉट फोटो (Erica Fernandes Rising The Temperature Of Internet : Actress Shares Her Bold And Hot Photos)

आपले लेटेस्ट हॉट आणि सेक्सी फोटोज्‌ टाकून एरिका फर्नांडिसने सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे. ‘कसौटी जिंदगी की – २’ या मालिकेतून जास्त करून ती नावारूपास आली. निळ्या बिकीनीतील तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

एकामागोमाग एक शुटिंग केल्यानंतर विरंगुळ्यासाठी एरिकाने ब्रेक घेतला. अन्‌ मुंबई जवळच्या एका रिसॉर्टमध्ये तळ ठोकला.

बिकीनी घालून स्विमिंग पुलमध्ये ती मनसोक्त बागडली. अन्‌ आपले फोटो काढून घेतले. ते बघून तिचे चाहते लाइक्स आणि कॉमेंट्‌स देत आहेत.

स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत, एरिकाने एका पाठोपाठ एक हॉट पोझेस्‌ दिल्या.

तिच्या शरीरास तकाकी आहे नि एब्स्‌ देखील मोहक आहेत. यासाठी तिची प्रशंसा होते. तिच्या शरीराचे हे गुणधर्म फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

स्विमिंग पुलच्या काठावर बसून ती रिलॅक्स मूडमध्ये दिसते आहे.

तिनं ज्या ‘कसौटी जिंदगी की – २’ मधून नाव कमावले, तो कार्यक्रम आता दिसेनासा झाला आहे, तरीपण एरिकाने चाहत्यांच्या मनात आपलं स्थान मिळवलं आहे.

तिनं दैनंदिन मालिकांमधून कामे केली. अन्‌ छोट्या पडद्यावर चांगलीच गाजली. प्रत्येक वेळी तिला चाहत्यांचे भरपूर प्रेम लाभले.

अखेर शेवटी हर्शद चोप्रा या सहकलाकारासह ती ‘जुदा कर दिया’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. संजीव चतुर्वेदी यांनी लिहिलेल्या गाण्यास संजय-अजय यांनी संगीतबद्ध केलं होतं.
एरिका आणि हर्शद एकमेकांसोबत डेट करीत आहेत, अशी अफवा या व्हिडिओच्या प्रकाशनाच्या वेळी उठली होती. एकत्र सुट्टी घालवितानाचे त्या दोघांचे फोटो तेव्हा व्हायरल झाले होते.