पापाराझींसमोर धायमोकलून रडली राखी सावंत, म्हणाल...

पापाराझींसमोर धायमोकलून रडली राखी सावंत, म्हणाली माझ्या मयताला तरी याल का? (Emotional Rakhi Sawant Asks Paparazzi- ‘Jis Din Main Mar Gai, Meri Kabra Pe Bhi Aaoge Kya?’)

राखी सावंत सध्या तिचे लग्न आणि आईच्या आजारपणामुळे खूप चिंतेत आहे. याच दरम्यान शर्लिन चोप्राचा वाद तिच्या अडचणीत भर घालत आहे.आधी तिचा पती आदिल त्यांचे लग्न मान्य करत नव्हता पण सलमान खानने मध्यस्थी केल्यानंतर आदिलने लग्न स्वीकारले.  त्यानंतर राखीने असेही सांगितले की, मुकेश अंबानीही तिच्या आईच्या महागड्या उपचारासाठी मदत करत आहेत.

आता राखीचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे त्यात  ती सुरुवातीला पापाराझीसोबत सामान्य पद्धतीने बोलताना दिसत होती पण नंतर ती म्हणाली – मला एक गोष्ट सांगा, ज्या दिवशी मी मरीन, तेव्हा तुम्ही माझ्या मयताला याल का?

हे ऐकून पापाराझी म्हणाले – असे बोलू नका, अजून खूप वेळ आहे.  पुढे, राखी भावूक होऊन रडायला लागते आणि म्हणते की माझी परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला माहित नाही… पुढे काय होईल… पापाराझींनाही राखीची दया येते व ते तिला समजावत म्हणतात…नाही, तू हजारो वर्षे जगशील, इतर म्हणाले, असे बोलू नकोस… , एका फोटोग्राफरने गमतीत, मी येईन असे म्हटले… त्यानंतर राखी सर्वांना बाय म्हणत निघून जाते.

राखीची ही स्टाईल पाहून लोक कमेंट करत आहेत.  काही जण तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत, तर अनेक जण तिला ड्रामा क्वीन आणि ओव्हर अॅक्टिंग म्हणत ट्रोल करत आहेत.