अवॉर्ड फंक्शनमध्ये हॉट दिसण्यासाठी एली एवरामने ...

अवॉर्ड फंक्शनमध्ये हॉट दिसण्यासाठी एली एवरामने असा विचित्र ड्रेस घातला की, युजर्स बोलले ‘इतकी मॉडर्न होण्याची गरज नाही ग बाई….’ (Elli Avram Gets Brutally Trolled For Wearing White Off-Shoulder Bold Gown At An Award Function, Netizens Say, Fashion Ke Naam Par Kuchh Bhi… See Pictures)

अभिनेत्री एली एवरामचे नेहमीच तिच्या नवनवीन लूक आणि स्टाइलसाठी कौतुक केले जाते. परंतु काल रात्री एका ब्युटी अवॉर्ड फंक्शनमध्ये एलीने घातलेल्या पोशाखावरुन तिला खूप ट्रोल केले गेले.

एल ब्युटी अवॉर्ड्सच्या निमित्ताने तेजस्वी प्रकाश, हिना खान, कार्तिक आर्यन, दीपिका पदुकोण, क्रिती सेनॉन आणि जान्हवी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी ब्लॅक कार्पेटवर आपला जलवा दाखवला. मात्र त्या सगळ्यांमध्ये एलीने अतिशय बोल्ड आणि हॉट कपडे परिधान केले होते. तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  पण तो पांढरा ऑफ शोल्डर ड्रेस नक्की कोणत्या प्रकारचा होता हे कोणालाच समजू शकले नाही. हा ड्रेस खूपच विचित्र होता आणि एलीलाही अजिबात शोभत नव्हता.

एलीने घातलेला ड्रेस तिलाच काय, कदाचित कोणालाच शोभून दिसला नसता. एलीची हेअर स्टाईल देखील खूप अतरंगी होती, त्यामुळे लोक तिच्या लूकवर कमेंट करू लागले. सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली. काहींनी तिला जोकर म्हटले तर काहींनी तिची उर्फी जावेदसोबत तुलना केली.

युजरने कमेंटमध्ये लिहिले की फक्त उर्फीचीच बदनामी का केली जाते, उर्फीच्या शरीरयष्टीमुळे किमान हे सर्व तिला थोडे तरी शोभते, पण हिच्याकडे पहा… दुसर्‍या युजरने लिहिले की – काश माझ्या गर्लफ्रेंडचा पण माझ्यावर इतका विश्वास असावा जितका हिला त्या सेलोटेपवर आहे… एकाने लिहिले केली की आमच्या आजी-आजोबांचा, आई-वडिलांचा काळ चांगला होता, आम्हाला आधुनिक व्हायचे नाही.

एका युजरने लिहिले,याची काय गरज होती… काही युजर्स याला फॅशनच्या नावाखाली नग्नता म्हणत आहेत. एकाने कमेंट केली की एली तू नेहमीच सुंदर दिसते पण यावेळी सॉरी खूप वाईट ड्रेसिंग सेन्स आहे, दुसऱ्याने लिहिले – हा कोणत्या प्रकारचा आत्मा येत आहे… फॅशनच्या नावावर काहीही …

एली बिग बॉसमुळे खूप चर्चेत आली होती. तिने मिकी व्हायरससारखे चित्रपट केले आहेत. परंतु मधला काही काळ ती चित्रपटांपासून दूर होती, मात्र आता तिने धनुषसोबत वाथी हा चित्रपट केला, ज्यामध्ये तिचे खूप कौतुक झाले.