एकता कपूरची दिवाळी पार्टी रंगली झोकात; सलमान खा...

एकता कपूरची दिवाळी पार्टी रंगली झोकात; सलमान खान ठरला लक्षवेधी (Ekta Kapoor’s Diwali Bash Was A Grand Event; Salman Khan Stole The Show)

एकता कपूरच्या दिवाळी पार्टीशिवाय दिवाळी उत्सव अपूर्ण वाटावा इतकी या पार्टीची महती आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षीही एकता कपूरने तिची दिवाळी पार्टी इतक्या दणक्यात प्रायोजित केली आहे की, पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फिटावे. एकता कपूरच्या या पार्टीत सहभागी होऊन सर्व सेलिब्रिटीनी पार्टीला फारच रंगत आणली.

या पार्टीच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर इतके सर्व सेलिब्रिटी एकत्र दिसले. या पार्टीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत, कारण हे सर्वच स्टार्स खूपच सुंदर दिसत होते.

मौनी रॉयपासून ते हिना खान, अनिता हसनंदानी, करिश्मा तन्ना, क्रिस्टल डिसूझा, रिद्धिमा पंडित, आशा नेगीपर्यंत सगळ्यांनीच या समारंभाची शोभा वाढवली होती. नंतर आलेल्या सलमानने सर्वांचे लक्ष स्वतःकडे ओढून घेतले. गेटजवळ सलमानला मीडिया आणि चाहत्यांनी पूर्णपणे घेरले होते.

या पार्टीत सलमानशिवाय सैफचा मुलगा इब्राहिम अली खानही दिसला. निर्माता करण राज कोहलीने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये करिश्मा, इब्राहिम अली आणि एकता दिसत आहेत.

इतर सेलिब्रिटींनीही त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर फोटो शेअर केले आहेत. करिश्मा तिच्या आउट फिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती, तर मौनी रॉयनेही बेबी पिंक कलरचा लेहेंगा परिधान करून चाहत्यांना घायाळ केले.

डिप नेकलाइनसह वायब्रेंट ब्लू कलरचा लेहेंगा परिधान केलेली हिना खानही अतिशय ग्लॅमरस दिसत होती.

क्रिस्टल डिसूझापासून इतर कलाकार सिल्व्हर, ग्रे किंवा व्हाईट आउट फिटमध्ये दिसले, तर अनिता हसनंदानीने लाल रंगाने सगळ्यांची वाहवा मिळवली.

पार्टीमध्ये सलमान खान विशेष लक्षवेधी ठरला. याशिवाय, कार्तिक आर्यन, तुषार कपूर, रिद्धी डोगरा, करण पटेल, आफताब शिवदासानी यांसारख्या सेलिब्रिटींनीही पार्टीला उपस्थिती लावली!

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम/विरल भयानी