सैफ-करीनाला पापाराझींनी फोटोसाठी विचारताच, सैफच...

सैफ-करीनाला पापाराझींनी फोटोसाठी विचारताच, सैफचा पारा चढला, म्हणाला आता आमच्या बेडरुममध्येच या (‘Ek Kaam Kariye Humare Bedroom Mein Aa Jaiye’, Says Saif Ali Khan To Paparazzi, Watch)

सध्याचे पापाराझी कल्चर आहे. हे फोटोग्राफर्स अनेकदा सेलिब्रेटींपाठी ठिय्या धरुन असतात. कलाकार मंडळी काय करतात, कुठे जातात या सर्व गोष्टींची माहिती ते प्रेक्षकांना पुरवत असतात. विमानतळ असो किंवा जिम, सलून,रेस्टॉरंट फोटोग्राफर्स सर्वत्र त्यांच्या पाठी फिरत असतात. बहुतेक सेलिब्रिटी देखील त्यांच्यासाठी हसतात आणि पोज देतात. पण काही कलाकारांना ते आवडत नाही आणि ते त्यांना टाळतात. अनेकदा या कलाकारांना  आपल्या प्रायव्हर्सीमध्ये ढवळाढवळ ढवळाढवळ वाटते. अशीच एक जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर.

हे दोघे अनेकदा पापाराझीपासून पळ काढतात. अशीच एक घटना नुकतीच. सैफ आणि करीना एकमेकांना साजेसे काळ्या रंगाचे पोशाख घालून जात होते. त्यांना पाहताच पापाराझींच्या कॅमेऱ्याचे फ्लॅश लाईट चालू झाले.

त्याचवेळी फोटोग्राफरने त्यांना फोटोसाठी विनंती केली, तेव्हा सैफ अली खान संतापला आणि म्हणाला एक काम करा, आमच्या बेडरूममध्ये या. हे ऐकून फोटोग्राफरने माफी मागितली आणि सॉरी सर म्हटले. यासोबतच इतर उपस्थित म्हणाले की, सर आमचे तुमच्यावर प्रेम आहे. यानंतर सैफने घरात जाऊन मीडियाला बाय केले आणि हसत हसत दरवाजा बंद केला. हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे.

करीना खूपच मस्त दिसत होती. सैफ आणि करीना दोघेही मलायका आणि अमृताच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीतून परतत होते.

युजर्सला सैफचे हे वागणे आवडले नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. लोक म्हणू लागले की अशा लोकांच्या मागे धावणाऱ्या मीडियावाल्यांची चूक आहे. काही लोक सैफला उद्धट म्हणत आहेत, तर काही म्हणतात की हा मीडियाचा दोष आहे, तो प्रत्येकाच्या गोपनीयतेमध्ये हस्तक्षेप करतात.