तुमच्या आवडत्या कपिल शर्मा, भारती सिंह व इतर वि...

तुमच्या आवडत्या कपिल शर्मा, भारती सिंह व इतर विनोदवीरांचं शिक्षण किती झालंय्? ठाऊक आहे का तुम्हाला? (From Kapil Sharma to Bharti Singh, Know The Educational Qualifications of Your Favorite Comedians)

टेलिव्हिजनवर स्टॅन्ड अप कॉमेडी सुरु झाल्यापासून, ते सादर करणार्‍या विनोदवीरांचा चाहतावर्ग वाढला आहे. कपिल शर्मा, भारती सिंह व इतरेजन लोकांचे आवडते कलाकार झाले आहेत. त्यांच्या खासगी जीवनाबद्दल त्यांचे कुतुहूल वाढले आहे. त्यातला एक हिस्सा आहे त्यांच्या शिक्षणाचा. आता लोकांचे हे आवडते कॉमेडियन्स किती शिकले आहेत, ते पाहूया.

कपिल शर्मा

कॉमेडी किंग गणला जाणारा कपिल शर्मा अमृतसरच्या श्रीराम आश्रम सिनीयर सेकंडरी स्कूल मध्ये व हिंदू कॉलेजात शिकला. त्याने जालंधर येथील कॉलेज ऑफ फाईन आर्टस् मधून पदवी मिळवली आहे.

भारती सिंह

कॉमेडी क्वीन म्हणून प्रसिद्धी पावलेली भारती सिंह डबल ग्रॅज्युएट आहे. तिनं आपलं शालेय शिक्षण अमृतसरच्या सरकारी शाळेतून घेतलं तर बीबीके एडीव्ही कॉलेज फॉर वुमेन या कॉलेजातून बी.ए.ची  पदवी घेतली आहे. नंतर गुजरात पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटी मधून तिने इतिहास घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.

कृष्णा अभिषेक

अचूक टायमिंगने विनोदी पंचेस् टाकणारा कृष्णा अभिषेक सेन्ट लॉरेन्स हायस्कूल मध्ये शिकला. मात्र पुढे कॉलेजात न जाता तो या अभिनयाच्या शाळेत दाखल झाला.

सुमोना चक्रवर्ती

कपिल शर्मा शो मधील सुमोना चक्रवर्ती लखनौच्या लॉरेटो कॉन्व्हेन्ट स्कूल मध्ये शिकली आहे. नंतर ती मुंबईत आली. येथील पवईच्या हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलमधून ती मॅट्रीक झाली. अन् जयहिंद कॉलेजातून इकॉनॉमिक्स या विषयात तिने बी.ए.ची पदवी घेतली आहे.

कीकू शारदा

कपिल शर्माच्या कॉमेडी शो मध्ये कधी पलक, कधी संतोष तर कधी बच्चा यादव ही पात्रे साकारणारा कीकू शारदा मुंबईचा आहे. त्याने येथील नरसी मोनजी कॉलेजातून कॉमर्सची पदवी घेतली आहे. पुढे त्याने चेतना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज् या संस्थेतून एमबीए केलं आहे.