लॉकडाऊन स्ट्रेस घालविण्याकरिता काय खाल? (Eatabl...

लॉकडाऊन स्ट्रेस घालविण्याकरिता काय खाल? (Eatables to Reduce Lockdown Stress)

जगभर पसरलेल्या कोरोनाच्या साथीने गेले अनेक महिने आपल्या सगळ्यांनाच घरात बंदिस्त करून टाकले आहे. लॉकडाऊनच्या वाढत असलेल्या मुदतीमुळे नानाप्रकारचे विचार मनात येत आहेत. त्यामुळे लोकांना घरी बसण्याचा कंटाळा आला असून पुढे कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, अशी प्रकारची चिंता वाटत आहे. या देशव्यापी लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनावर मोठा ताण (Reduce Lockdown Stress) आलेला आहे. ज्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. परंतु या परिस्थितीतही निरोगी व चिंतामुक्त राहण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये खालील पदार्थांचा समावेश करा.

डार्क चॉकलेट – आपला बिघडलेला मूड पूर्ववत करण्यासाठी चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीरात जे एंडॉर्फिन्स बनतात, त्यामुळे मनावरील ताण कमी होऊन आपणांस हलके वाटते. जेवणानंतर डार्क चॉकलेटचा एक तुकडा जरी खाल्ला तरी तो तात्काळ तुमचा मुड ठीक करतो.

केळं– केळं हे अतिशय गुणकारी फळ आहे. यातील पोटॅशिअममुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. केळं खाल्ल्याने रक्तदाब सामान्य राहतो. केळ्यामध्ये नैसर्गिक शर्करा असते. त्यामुळे ऊर्जा वाढते. म्हणूनच आहारतज्ज्ञ देखील न्याहारीमध्ये केळं खाण्याचा सल्ला देतात. त्यातून शरीराला आवश्यक असलेलेग्लूकोज मिळते.

लिंबूवर्गीयफळं/आंबट गोड फळं– सायट्रस फळांमध्ये संत्री, मोसंबी, लिंबू अशी आंबट गोडफळं अंतर्भूत होतात. यात क जीवनसत्व आणि अँटि ऑक्सिडंट भरपुर प्रमाणात असतात.

त्यामुळे तणाव कमी होतो. या फळांमध्ये मॅग्नेशिअम असल्यामुळे शरीराचा थकवा दूर होतो. आणि चांगली झोप लागते. याशिवाय क जीवनसत्त्वामुळे रोगप्रतीकारक शक्ती वाढते. जखम झाली असल्यास ती लवकर भरून निघते.

पिस्ता – पिस्ता खायला सगळण्यांनाच आवडते. यामध्ये जस्त आणि मॅग्नेशिअम असते.

ते टेन्स झालेल्या नसांना शांत करते म्हणूनचकाहीजण ऑफिसमध्येही पिस्ता नेऊन ठेवतात. जेव्हा निराशाजनक परिस्थिती येते त्यावेळेला पिस्ता खाल्ल्याने बरं वाटते.

दही

पोटात जंतुसंसर्ग झाल्यासही आपल्याला ताण येतो, हे संशोधनांती लक्षात आलेलं आहे. अशावेळी

दही खावे. दह्यामधील प्रोबायोटिक्स हे आपली पचनशक्ती सुधारून पोट मजबूत बनवते. ज्यामुळे

आपल्यामेंदूला चांगल्या भावनांचा सिग्नल मिळतो. असं हे कॅल्शियम आणि प्रथिनांनी भरलेलं

दही खाणाऱ्यास तणावाचं प्रमाणंही कमी होतं.

लॉकडाऊनच्यादरम्यान मिळणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. तेव्हा पुढचा विचार करून आधीच आजार ओढवून घेण्यापेक्षा घरात सुरक्षित राहण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा.

स्वयंपाकासाठी उपयुक्त १० टिप्स, ज्या प्रत्येक गृहिणीस माहीत हव्यात (10 Awesome Cooking Tips & tricks Every Woman Should Know)