केस धुताना काय काळजी घ्याल? (Easy Washing Trick...

केस धुताना काय काळजी घ्याल? (Easy Washing Tricks For Hair)

केस धुण्याच्या योग्य पद्धतीमुळे तुमच्या केसांचा रंगढंग पूर्णतः बदलू शकतो. केसांचं आरोग्य सुधारून त्यांना छान चमक आणि बाउन्स मिळू शकतो. केस मुलायम होऊ शकतात. तेच काही सामान्य चुकांमुळे तुमचे सुंदर केस नकळतच खराबही होऊ शकतात. तेव्हा काळजीपूर्वक केस धुवा.
आठवड्यातून केस किती वेळा धुवावेत, हे तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून आहे. जसं- तेलकट केस लवकर धुवावे लागतात.


वारंवार केस धुऊ नका. बहुतांश लोकांना दररोज केस धुण्याची गरज नसते. हे हिताचं नाही.
एक दिवस आड किंवा दोन दिवसांनी एकदा केस धुणं योग्य ठरतं.
केस तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, केसांच्या मुळाशी असलेलं नैसर्गिक तेल केसांच्या टोकापर्यंत पोहोचल्यावर केस सर्वाधिक सुंदर दिसतात. त्यामुळे केस वारंवार न धुणं योग्य ठरतं.
केस वारंवार धुण्याची गरज भासत असेल, तर वापरत असलेल्या शाम्पू-कंडिशनर या उत्पादनांविषयी पुन्हा विचार करा. आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या प्रकारानुसार हेअर प्रॉडक्ट्सचा वापर करा.


केस धुताना एकदा शाम्पू लावून केस धुतले की, पुन्हा शाम्पू लावू नका. एकाच वेळी दोनदा केसांना शाम्पू करण्याची मुळीच गरज नसते, हे लक्षात घ्या. केसांना एकदाच शाम्पू करणं पुरेसं असतं. केस अगदीच अस्वच्छ असतील किंवा पहिल्यांदा केलेल्या शाम्पूचा व्यवस्थित फेस आला नाही, तर दुसर्‍यांदा शाम्पू करता येईल.