नाकावरच्या ब्लॅकहेडस्ना औषध काय? (Easy Tricks T...

नाकावरच्या ब्लॅकहेडस्ना औषध काय? (Easy Tricks To Remove Black Heads From Nose)

अधिक प्रमाणात ब्लॅकहेडस् हे नाकावर असतात. तर काही लोकांच्या हातावर अथवा खांद्यावरही ब्लॅकहेडस् असतात. धूळ, प्रदूषण आणि माती या सगळ्याचा निचरा त्वचेवरून न झाल्याने घाण जमा होते आणि त्याचे ब्लॅकहेडस् तयार होतात. ज्यामुळे चेहरा दिसायला खराब दिसतो.
सुंदर, नितळ आणि उजळ त्वचा असावी अशी प्रत्येक तरुणीची, स्त्रीची इच्छा असते. परंतु, वातावरणातील बदल आणि आहारातील बदल यामुळे आपल्या त्वचेवर थेट परिणाम होत असतो. सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी ब्लॅकहेडस्च्या समस्येने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. अनेक जणांना नाकावर किंवा नाकाजवळील भागात ब्लॅकहेडस् किंवा व्हाइटहेडस् होतात. अनेक उपाय केल्यामुळे किंवा महागडी सौंदर्य प्रसाधने वापरल्यानंतरही या समस्येपासून सुटका होत नाही. तसेच प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाऊन ही समस्या सुटत नाही.
ब्लॅकहेडस् का होतात?
ब्लॅकहेडस्ची समस्या सगळ्यांनाच असते. त्वचेवरील छिद्रांमध्ये तेल आणि घाण जमा झाल्याने ब्लॅकहेडस् तयार होतात. ब्लॅकहेडस् झाल्यानंतर तुमच्या चेहर्‍यावर ते पटकन उठून दिसतात. चेहर्‍यावर अगदी लहान लहान ठिपके दिसत राहतात. अधिक प्रमाणात ब्लॅकहेडस् हे नाकावर असतात. तर काही लोकांच्या हातावर अथवा खांद्यावरही ब्लॅकहेडस् असतात. धूळ, प्रदूषण आणि माती या सगळ्याचा निचरा त्वचेवरून न झाल्याने घाण जमा होते आणि त्याचे ब्लॅकहेडस् तयार होतात. ज्यामुळे चेहरा दिसायला खराब दिसतो. महिला असो वा पुरूष प्रत्येक जण ब्लॅकहेडस् काढण्यासाठी नेहमीच पार्लर्सचा आधार घेतात. पण कितीही वेळा पार्लरमध्ये गेलो तरीही हे जिद्दी ब्लॅकहेडस् परत येतात. सतत ब्लॅकहेडस् काढण्याने त्वचेवरील चमकही कमी होते. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला सतत पार्लरला जाणेही शक्य नसते. मग अशावेळी काय करायचे? अशा वेळी ब्लॅकहेडस् काढण्यासाठी घरगुती गोष्टींचा वापर करण्याची गरज आहे.
चला तर मग पाहूयात ब्लॅकहेडस् घालविण्याचे काही घरगुती उपाय.

ब्लॅकहेडस् घालविण्याचे काही घरगुती उपाय

अंड्याचा सफेद भाग आणि मध
तुम्हाला ब्लॅकहेडस्ची समस्या जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही 1 अंड्याचा सफेद भाग घ्या आणि त्यात 2 चमचे मध मिक्स करा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि साधारण 20 मिनिट्स तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा आणि स्वच्छ पुसून त्यावर मॉईश्चरायजर लावा. असं केल्याने चेहर्‍यावरील ब्लॅकहेडस् जाण्यास मदत मिळते. तसंच तुमचा चेहरा अधिक चमकदार होतो.

गुलाबपाणी
1-1 चमचे गुलाबजल आणि मीठ मिक्स करून ब्लॅकहेडस्वर लावा, हलका मसाज करा आणि 10 मिनिटांनी धुवा.

डाळीचे पीठ
1 चमचा बेसनामध्ये 2 चमचे दूध आणि चिमूटभर मीठ मिसळून पेस्ट बनवा. ब्लॅकहेडस्वर लावा. 10 मिनिटांनंतर ते धुवा.

लिंबाचा रस
ब्लॅकहेडस्वर लिंबाचा रस लावून मसाज करा. 2 मिनिटांनी त्यावर मीठ लावून हलक्या हातांनी मसाज करा. 5 मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

बेकिंग सोडा
अर्धा कप पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. ब्लॅकहेडस्वर 5-8 मिनिटे मसाज करा. कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने धुवा.

हळद
2-2 चमचे हळद आणि पुदिन्याचा रस मिसळून पेस्ट बनवा. याने चेहर्‍याला 5 मिनिटे मसाज करा, नंतर कोमट पाण्याने धुवा.

बेकिंग सोडा आणि लिंबू
एक लिंबू घेऊन ते मधोमध चिरा. यातील एका फोडीवर बेकिंग सोडा टाकून ते लिंबू चेहर्‍यावर आणि ब्लॅकहेडस् असलेल्या ठिकाणी चोळा. तसंच ब्लॅकहेडस् असलेल्या ठिकाणी काही वेळ ते लिंबू तसंच दाबून ठेवा. पाच- सहा मिनिटे या लिंबाने चेहर्‍यावर मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.

टोमॅटो
अनेक वेळा टोमॅटोच्या रसाचा स्क्रब म्हणून सुद्धा वापर केला जातो. तसंच त्याचा उपयोग ब्लॅकहेडस् काढण्यासाठीही करता येतो. टोमॅटोचा रस काढून तो चेहर्‍याला लावा आणि ब्लॅकहेडस् असलेल्या ठिकाणी या रसाने मसाज करा.

दालचिनी
एक चमचा दालचिनीची पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण ब्लॅकहेडस् असलेल्या ठिकाणी लावा. हा प्रयोग आठवड्यातून 2 ते 3 वेळा करा.

कोरफडचा रस
अनेक त्वचाविकारांवर कोरफड गुणकारी आहे. तसंच ब्लॅकहेडस् घालविण्यासाठीदेखील तिचा वापर केला जातो. यासाठी कोरफडच्या रसात हळद मिक्स करुन हा लेप ब्लॅकहेडस् असलेल्या ठिकाणी लावावा. त्यानंतर 15-20 मिनिटे तो तसाच चेहर्‍यावर वाळू द्यावा. हा लेप वाळल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर एखाद्या उत्तम ब्रॅण्डचं मॉईश्चराइजर लावा.