सौंदर्यवर्धक मुळा (Easy Makeover Through Radish)

सौंदर्यवर्धक मुळा (Easy Makeover Through Radish)

मुळा हा कितीही आरोग्यदायी असला तरी त्याच्या उग्र वासामुळे बरेच जण तो खाताना नाकं मुरडतात. परंतु मुळा हा सौंदर्यवर्धक आहे, हे समजल्यावर तुमचा मुळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी तसेच केसांचे गळणे थांबवण्यासाठीदेखील मुळा हा अतिशय उपयुक्त आहे.  चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी तसेच केसांचं गळणं थांबवून ते सिल्की बनविण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. एकदा मुळ्याची पेस्ट चेहर्‍यास आणि केसांना लावून त्याची कमाल तर पाहा.

त्वचेसाठी मुळ्याचे फायदे
– मुळा बाजारात अगदी सहज मिळतो. हा त्वचेस नैसर्गिकरीत्या निरोगी ठेवतो.
– मुळ्यामध्ये क जीवनसत्त्व आणि अनेक अँटीऑक्सीडंट असतात जे त्वचेसाठी लाभदायक ठरतात.
– मुळा अँटी एजिंग म्हणूनही उपयुक्त ठरतो.
– मुळ्याची पेस्ट रोज त्वचेवर लावल्यास त्वचेवर एकही डाग राहणार नाही.
– मुळा त्वचेचे रोग दूर करतो.
– चेहर्‍यावरील मुरमं घालवितो.
– मुळ्यामुळे त्वचेची आर्द्रता राखली जाते.
– त्वचेस डिटॉक्सीफाय करण्यास मदत करतो.
– त्वचेस नैसर्गिक चमक देतो.
– मुळा शरीरातील टॉक्सिंस बाहेर काढतो.

असा बनवा मुळ्याचा फेस पॅक
मुळ्यापासून बनवलेला फेस पॅक त्वचा निरोगी राखतो. या पॅकने आपण त्वचेस ब्लीचही करू शकतो. परंतु अतिसंवेदनशील त्वचा असल्यास त्यांनी हा पॅक वापरू नये, कारण यामुळे थोडी जळजळ होऊ शकते. तसं पाहिलं तर यापासून कोणत्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही. मुळ्याची पेस्ट बनवून लावल्यास ती अधिक परिणामकारक असते.

मुळ्याचा फेस पॅक बनवण्याची पद्धती
मुळा सोलून चांगला वाटून घ्या. मुळ्याच्या पेस्टमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. यात काही थेंब जैतून चे तेल घालू शकता. हा फेस पॅक त्वचेस लावा आणि काही वेळाने धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता. चेहर्‍यावर लावण्यापूर्वी हा पॅक हाताला वा पायाला लावून पाहा, जर तुमच्या त्वचेस तो सूट झाला तरच चेहर्‍यास लावा. केसांच्या आरोग्यासाठीही मुळा अतिशय उपयुक्त ठरत आहे. मुळ्याची पेस्ट केसांना लावल्यास केस गळण्याचे थांबून चमकदार होतात. तेव्हा मुळात मुळा हा वाईट नाहीये हे लक्षात घ्या.