जेठालालची भूमिका आधी हे कलाकार करणार होते, पण द...

जेठालालची भूमिका आधी हे कलाकार करणार होते, पण दिलीप जोशीने बाजी मारली (Earlier These Actors Got the Offer of Jethalal’s Character, But Dilip Joshi Got This Role)

टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली १३ वर्षे दर्शक सातत्याने पाहत आहेत. आजही या मालिकेची लोकप्रियता किंचितही कमी झाली नसून अजून वाढली आहे. निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताहेत. या शोमधील सर्व कलाकार महत्त्वाचे असले तरी जेठालालची मध्यवर्ती भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे. दिलीप जोशीला जेठालालची भूमिका इतकी चपखल बसली आहे, की जेठालाल आणि दिलीप जोशीला अलग म्हणून स्वीकारणं कठीण आहे. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जेठालालच्या व्यक्तिरेखेसाठी, शोचे निर्माते असित मोदी यांना खूप पापड बेलावे लागले. दिलीप जोशीपूर्वी अनेक अभिनेत्यांना या पात्रासाठी त्यांनी संपर्क साधला होता. जाणून घेऊया त्या अभिनेत्यांची नावे, ज्यांना जेठालालची भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण दिलीप जोशीने ही संधी स्वीकारली आणि त्याचे सोनं केलं.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

योगेश त्रिपाठी

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

रिपोर्ट्सनुसार, असित मोदींनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालालच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम योगेश त्रिपाठीशी संपर्क साधला होता. टीव्हीवरील हप्पू सिंग म्हणजेच अभिनेता योगेश त्रिपाठीने जेठालालची भूमिका साकारण्यास स्पष्टपणे नकार दिला.

राजपाल यादव

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

असित मोदी जेव्हा बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवकडे जेठालालच्या भूमिकेची ऑफर घेऊन पोहोचले, तेव्हा त्यानेही हे पात्र साकारण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. त्यावेळेस राजपालने, त्याला सध्या आपल्या फिल्मी करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे त्याला टीव्ही मालिकांमध्ये काम करायचे नसल्याचे सांगितले.

अहसान कुरैशी

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

टीव्हीवरील प्रसिद्ध हास्यकलाकार एहसान कुरेशी यालाही जेठालालची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, त्याने देखील ही ऑफर स्वीकारली नाही आणि हे पात्र करण्यास नकार दिला.

कीकू शारदा

टो सौजन्य: इंस्टाग्राम

टीव्ही अभिनेता आणि कॉमेडियन किकू शारदालाही जेठालालच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती, परंतु त्यानेही ही भूमिका करण्यास नकार दिला. नवीन प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्यामुळे आपण हे पात्र करू शकणार नाही, असा युक्तिवाद त्याने केला होता.

दिलीप जोशी

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

शेवटी असित मोदी या पात्राची ऑफर घेऊन अभिनेता दिलीप जोशी याच्याकडे पोहोचला. जेव्हा त्याला ही ऑफर मिळाली तेव्हा त्याने चित्रपट आणि मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या. अशा परिस्थितीत त्याला जेठालालच्या पात्राची ऑफर आली तेव्हा त्याने लगेच होकार दिला.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

१९८९ मध्ये दिलीप जोशी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु त्यांच्या करिअरमध्ये एक असा टप्पा आला जेव्हा त्यांना एक वर्ष काम न करता घरी बसावे लागले होते. जेव्हा असित मोदींना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी दिलीप जोशी यांना जेठालालचे पात्र ऑफर केले आणि त्याने लगेच हो म्हटले, त्यानंतर दिलीप जोशीला कधीही मागे वळून पाहावे लागले नाही आणि आज जेठालाल हे प्रेक्षकांचे सर्वात आवडते पात्र बनले आहे.