सावळा रंग उजळ करण्यासाठी या ६ अभिनेत्रींनी केले...

सावळा रंग उजळ करण्यासाठी या ६ अभिनेत्रींनी केलेली धडपड (Dusky Beauties Of Bollywood Who Went For Skin Lightenig Treatment)

बॉलिवूडमधील काही सावळ्या रंगाच्या अभिनेत्रींनी आपल्या रंगाचा न्यूनगंड न बाळगता आपल्या अभिनयाने यश तर मिळवलंच शिवाय चाहतेही अमाप बनवले. आज मात्र या अभिनेत्रींकडे पाहताना त्यांच्यात आमुलाग्र बदल झालेला आपण पाहतो. याचं कारण सौंदर्याच्या मापदंडात चपखल बसण्यासाठी त्यांनी अतिशय धडपड केलेली आहे. कॉस्मेटिक सर्जरी, स्किन लाइटनिंग यासारखे उपचार करून घेतले आहेत. आज आपण अशा अभिनेत्रींबाबत जाणून घेणार आहोत ज्यांनी आपला सावळा रंग उजळ करण्यासाठी स्किन लाइटनिंग ट्रीटमेंट करून घेतली आहे.

काजोल

बॉलिवूडमधे प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये काजोल एकदम सावळी दिसली होती. त्यानंतर अचानक तिचा नवा लूक पाहून सर्वच चकीत झाले. काजोलने आपला रंग उजळवण्यासाठी स्किन लाइटनिंग करून घेतलं असल्याचं बोललं जात होतं. परंतु काजोलने याचा साफ इन्कार केला आहे. मी कोणत्याही प्रकारची स्कीन सर्जरी केलेली नाही, असेच ती सांगत आली आहे. लग्नानंतर शूटिंगसाठी बाहेर येणं- जाणं कमी झालं, आणि उन्हाने सावळी झालेली स्कीन घरी राहिल्यामुळे क्लीन झाली असं ती म्हणते. अर्थात हा तिचा (गैर)समज आहे.

दीपिका पादुकोण

बी-टाउनची सर्वात हुशार आणि अष्टपैलू अभिनेत्री दीपिका पादुकोनचं सौंदर्य आणि तिच्या स्टाइलचे लाखो दिवाने आहेत. परंतु दीपिकाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा ती एवढी सुंदर नव्हती. सावळ्या वर्णाची होती. आता मेकअप, आहाराच्या चांगल्या सवयीमुळे ती अतिशय सुंदर दिसू लागली आहे, असं म्हणतात. दीपिकाचं हे बदललेलं रुपडं, तिने सौंदर्यासाठी स्किन ट्रीटमेंट करून घेतली असल्यामुळे आहे, असंही बोललं जातंय्‌.  

प्रियंका चोप्रा

देसी गर्ल प्रियंका चोप्राचे सुरुवातीचे चित्रपट पाहिले तर लक्षात येईल की ती देखील सावळीच होती. तिच्या वर्णावर अनेकांनी कमेंटस्‌ही केल्या. शिवाय तिला वंशवादालाही सामोरं जावं लागलं. सावळ्या रंगामुळे बऱ्याचदा तिला भूमिकांसाठी डावललं गेलं आहे. पण प्रियंकाने हार न मानता नाक, ओठ यांच्या सर्जरीबरोबरच रंग उजळवण्यासाठीही त्वचेवर उपचार करून घेतले आहेत. ४-५ वर्षांपूर्वी प्रियंकाने मेलेनिन रिडक्शन ही सर्जरी केली आणि आज ती बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही लोकप्रिय झालेली आहे.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचं सौंदर्य कालातीत आहे. तिच्या सौंदर्यावरून तिचं वय सांगणं कठीण आहे. जसजशी ती मोठी होतेय्‌, ती अधिकाधिक रुपवान दिसत आहे. आजही ती बॉलिवूडमधील सर्वात फिट, हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये गणली जाते. योग आणि निरोगी जीवनशैली याबरोबरच शिल्पाने सौंदर्योपचारही करून घेतले आहेत. नाकाच्या सर्जरीबरोबरच तिने रंग उजळवण्यासाठी स्किन व्हाइटनिंग ट्रीटमेंटही करून घेतली असल्याचे बोलले जाते.

बिपाशा बसु

बॉलीवूडची हॉट ब्युटी बिपाशा बसुने आपला सावळा रंग नेहमीच अभिमानाने दर्शविला आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने, ‘मला माझा वर्ण आवडतो, या वर्णामुळे मी अधिक सेक्सी आणि मोहक दिसते,’ असं म्हटलं आहे. परंतु अलिकडेच चांगल्या भूमिकांसाठी तिनेही त्वचेवर उपचार करून आपला रंग उजळ करून घेतला होता. काही वर्षांपूर्वीची आणि आताची बिपाशा पाहिलीत तर तिच्या वर्णातील फरक आपल्या लक्षात येईल.

मौनी रॉय

टेलिव्हिजन ते मोठा पडदा आणि सोशल मीडियावरही मौनी रॉयच्या सुंदरतेचा डंका आहे. मौनीमधील जबरदस्त परिवर्तनाने सगळ्यांना अचंबित करून टाकलं होतं. मौनीनेही आपला रंग उजळवण्यासाठी ग्लू थियोन नावाच्या स्किन लाइटनिंग टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे.

या व्यतिरिक्त रेखा, श्रीदेवी, राणी मुखर्जी यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी आपला सावळा रंग उजळवण्यासाठी वैद्यकीय उपचार करून घेतले आहेत. यापैकी अनेक अभिनेत्रींनी हे मान्य केले नसले तरी त्यांच्यातील परिवर्तनाने सत्य दाखवून दिले आहे.