मद्यधुंद अवस्थेत सुरक्षा रक्षकाच्या अंगचटीला आल...

मद्यधुंद अवस्थेत सुरक्षा रक्षकाच्या अंगचटीला आल्याचा सारा अली खानवर आरोप (‘Drunk’ Sara Ali Khan Gets Brutally Trolled For Inappropriately Touching A Security Guard, Watch)

तसं पाहायला गेलं तर सारा अली खान आपल्या साध्या, गोड स्वभावाबाबत टपून बसलेल्या छायाचित्रकारांमध्ये आणि इतर लोकांमध्येही प्रसिद्ध आहे. पण व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे ती लोकांच्या टीकेचा विषय बनली आहे.

या व्हिडिओमधे सारा अली खान एका सुरक्षा रक्षकाच्या अंगचटीला आल्याचे दिसते आहे. आपली दोस्त शर्मिन सहगल याच्यासोबत ती मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताना त्यात दिसते आहे. खरं पाहता, तिथे प्रवेशद्वारावर उभे असलेला सुरक्षा रक्षक तिला जागा देत आहे, तरी पण सारा त्याला स्पर्श करून पुढे जात आहे. या व्हिडिओत ती धडपडताना दिसते आहे अन्‌ तिची मैत्रिण तिला सांभाळताना दिसते आहे.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. ते म्हणताहेत की, साराने ज्या पद्धतीने त्या गार्डला धक्का दिला आहे, तसा जर परपुरुषाने चुकून जरी तिला दिला असता, तर सगळ्यांनी त्याला धारेवर धरले असते. किंवा एखाद्या गार्डने जर असा प्रकार केला असता तर एव्हाना त्याची नोकरी गेली असती. रेस्टॉरंटच्या गार्डने साराला जाण्यासाठी पुरेशी जागा करून दिली तरी तिने त्याला धक्का मारला आहे. सारा इतकी मद्यधुंद आहे की, त्या गार्डच्या आपण अंगचटीला गेलो आहे, हे तिच्या गावी पण नाही; असा लोकांचा आरोप आहे.