मनोरंजन: शाहरुख खान भाजपामध्ये गेला, तर अंमली प...
मनोरंजन: शाहरुख खान भाजपामध्ये गेला, तर अंमली पदार्थ साखर होतील; भुजबळांचे उपरोधिक विधान (Drugs Will Become Sugar Powder, If Shahrukh Joins BJP: Minister Bhujbal’s Mockery)

By Deepak Khedekar in मनोरंजन

”शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केला तर अंमली पदार्थ साखर होतील”, अशी उपरोधिक टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. क्रूसवरील ड्रग्स प्रकरणात आर्यन खान वर चालू असलेल्या कारवाईबद्दल भुजबळांनी तोंड उघडले.
अलीकडेच गुजरात मधील मुंदडा बंदरावर अंमली पदार्थांचे मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. त्याची सखोल चौकशी करण्याऐवजी नार्कोटिक्स विभाग खानांच्या मागे लागले आहे, असाही आरोप भुजबळ यांनी केला.

नारकॉटिक्स विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे दुसरे मंत्री नवाब मलिक यांनी जे आरोप लावले आहेत, त्याबाबद वानखेडेंनी मालिकवर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून मलिकसह इतर राजकीय पुढाऱ्यांना होणाऱ्या परिणामांची जाणीव होईल, असे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले.