जावेद जाफरींची मुलगी अलाविया हिचे सौंदर्य व ग्ल...

जावेद जाफरींची मुलगी अलाविया हिचे सौंदर्य व ग्लॅमरस लूकची आहे चर्चा (Drop Dead Gorgeous : Meet Javed Jafri’s Beautiful And Glamorous Daughter Alavia)

जावेद जाफरीं हा हरहुन्नरी कलाकार आहे. आपले सुप्रसिध्द विनोदवीर पिताजी जगदीप यांच्या पेक्षा त्याने आपली वेगळी इमेज प्रस्थापित केली. अभिनय, टी.व्ही. कार्यक्रम निर्माता आणि सूत्रधार तसेच नर्तक म्हणून मोठे यश मिळविले. आता त्याची तरुण मुलगी अलाविया, त्याच्या पेक्षा वेगळं काही करू पहाटे आहे. ती इतकी सुंदर आहे की, जणू सुपरमॉडेल वाटते. सिनेसृष्टीच्या ग्लॅमरपासून अलाविया जाफरी तशी दूरच आहे. पण इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर तिने स्वतःचे ग्लॅमर निर्माण केले आहे. त्यामुळे तिने सिनेमात पदार्पण करावं, असा आग्रह लोक धरू लागले आहेत.

सध्या अलाविया न्यूयॉर्क मध्ये फॅशन डिझायनींगचे शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. अलाया व अलाना  पांडे या मैत्रिणींसोबत काही लाईफस्टाईल प्रॉडक्ट्स आणि कपडे यांचा प्रसार करते आहे.

स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो अलाविया प्रसिध्द  करत असते. पण पारंपरिक वेशभूषेत देखील ती तेवढीच सुंदर दिसते.

सौजन्य : सगळे फोटो इन्स्टाग्राम