दिग्गज अभिनेता प्राण यांचा आदर्श बाळगणारे डॉ. ग...

दिग्गज अभिनेता प्राण यांचा आदर्श बाळगणारे डॉ. गिरीश ओक (Dr. Girish Oak Is The Followers Of Veteran Actor Pran)

मराठी मालिकांमधून विविधांगी भूमिका करणारे ज्येष्ठ कलाकार डॉ. गिरीश ओक आता ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत परमेश्वर स्वरूप स्वामीजी हे पात्र रंगवत आहेत. स्टार प्रवाहवर चालू असलेल्या या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचलं आहे. त्यामध्ये अशा प्रकारची भूमिका गिरीश ओक पहिल्यांदाच साकारत आहेत. याबद्दल ते म्हणतात,” मला वरकरणी जे दिसत नाहीत, पण प्रत्यक्षात वेगळे असतात, अशी पात्रे साकारायला आवडतात. त्यामुळे स्वामीजींची हि भूमिका साकारणं मला नवं आव्हान आहे. मी हे पात्र साकारताना नवी लकब शोधून काढली आहे. दिग्गज अभिनेता प्राण यांचा मी चाहता आहे. भूमिका रंगवताना ते त्या पात्राची छाप प्रेक्षकांवर पडायचे. त्यामुळे नवी व्यक्तिरेखा सादर करताना मी त्यांना डोळ्यासमोर ठेवतो”.

Girish Oak, Veteran Actor Pran