कारकीर्द उंचावण्यासाठी… (Door Are The Sym...

कारकीर्द उंचावण्यासाठी… (Door Are The Symbols Of Opportunity)

प्रत्येक व्यक्तीला आपली कारकीर्द महत्त्वाची वाटते. म्हणूनच घरातील प्रत्येक दरवाजाकडे विशेष लक्ष द्यायला हवं. याशिवाय आणखी काही उपाय करता येतील.

फेंगशुई शास्त्रामध्ये घराचा मुख्य दरवाजा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. घरामध्ये या मुख्य दरवाजामार्फत ऊर्जेचा प्रवेश होत असतो. घरात प्रवेश करणार्‍या ऊर्जेचा दर्जा या दरवाजावर अवलंबून असतो. म्हणूनच मुख्य दरवाजाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं ठरतं. ऊर्जेने घरात प्रवेश केल्यानंतर पाणी, लाकूड, अग्नी, पृथ्वी आणि धातू या पाच मूलभूत तत्त्वांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करायला हवं. मात्र काही घरांमध्ये याकडे लक्षच दिलं जात नाही. आणि मग त्याचे अशुभ परिणाम त्यांना भोगावे लागतात.
घराचा केवळ मुख्य दरवाजाच नव्हे, तर घरातील सर्वच दरवाजे महत्त्वाचे असतात. घरातील दरवाजे हे जीवनातील संधीचे प्रतीक असतात. म्हणूनच घरातील सर्व दरवाजे विना अडगळ पूर्णपणे उघडतील, याची काळजी घ्यायला हवी.
प्रत्येक व्यक्तीला आपली कारकीर्द महत्त्वाची वाटते. म्हणूनच मी असा सल्ला देईन की, घरातील प्रत्येक दरवाजाकडे विशेष लक्ष द्या. घरात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत कायम राहील असं पाहा. तसंच घरात वापरताना कुठेही अडसर येणार नाही, हेही आवर्जून पाहा. म्हणजे तुमच्या कारकिर्दीत अडसर येणार नाही. याशिवाय आणखी काही उपाय करता येतील.

 • घरामध्ये कुठेही किंवा कारकिर्दीच्या क्षेत्रात पाण्यामध्ये एक धातूचा कासव ठेवा. कार्यालयातही अशा प्रकारे कासव ठेवता येईल.
 • टर्मोलीन हे काळ्या रंगाचं स्फटिक संरक्षणासाठी अतिशय उपयुक्त आहे. ते घरात ठेवा.
 • झोपण्याच्या खोलीत आरसे ठेवू नका.
 • झोपण्याच्या खोलीत पाणी किंवा पाण्याचं चित्र ठेवू नका.
 • घरात वेली वाढवू नका.
 • घरातील कोपरे फुलझाडांनी शोभिवंत करू नका.
 • विनाशकारी स्वरूपाची चित्रं, जसं- टायटॅनिक जहाज, युद्धातील चित्रं इत्यादी घरात लावू नका.
 • घरात हिंसक आकृती किंवा पुतळे ठेवू नका.
 • झोपण्याच्या खोलीत झाडाझुडपांची सजावट करू नका.
 • शौचालयाचं दार उघडं ठेवू नका.
 • तुळई (बीम) किंवा कपाटाखाली झोपू नका.
 • स्वयंपाकघरात अग्नी आणि पाणी एकत्र ठेवू नका.
 • फ्रीजवर मायक्रोवेव्ह ओव्हन किंवा टोस्टर ठेवू नका.
 • घरामध्ये कचरा साठवून ठेवू नका.
 • प्रसिद्धीच्या भागात कधीही पाणी ठेवू नका. यामुळे तुमची प्रसिद्धी धुऊन जाईल.
 • उत्तरेला शौचालय असलेलं घर घेऊ नका.
 • बंद पडलेली घड्याळं धोकादायक असतात. ती थेट प्रसिद्धीवर परिणाम करतात.
 • दक्षिण दिशेला लाल रंगाचा दिवा कायम तेवत ठेवा.
 • पक्ष्यांची किलबिल किंवा सुमधुर संगीत वाजणारं घड्याळ दक्षिण दिशेला लावा.
 • प्रसिद्धीच्या माध्यमात किंवा राजकारणात कार्यरत असाल, तर स्वतःचं छायाचित्रं घरातील दक्षिण दिशेला लावा.