तू उर्फी जावेद होऊ नकोस ग बाई- बॅकलेस ब्लाऊजमध्...

तू उर्फी जावेद होऊ नकोस ग बाई- बॅकलेस ब्लाऊजमध्ये जान्हवी कपूरला पाहून युजरची तिखट प्रतिक्रिया (‘Don’t You Become Uorfi Javed: Troller Comments On Viewing Janhavi Kapoor In Backless Blouse)

जान्हवी कपूरच्या नव्या पारंपरिक लूकने सगळ्यांची मने जिंकली आहेत. डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहताच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये जाह्नवी कपूर जबरदस्त हॉट आणि बोल्ड दिसली. जान्हवी या कार्यक्रमाला सुंदर अशी सेक्विन साडी नेसून गेली होती. पांढऱ्या रंगाच्या या साडीवर वेगवेगळ्या रंगाचे सेक्लिन लावले होते. साडीवर जान्हवीने मॅचिंग बॅकलेस ब्लाउज घातला होता.

ग्लोइंग मेकअप, स्मोकी आइज, वेगवेगळ्या रंगाच्या डायमंडचे मोठे कानातले आणि न्यूड लिपस्टिकने जान्हवीने आपला लूक पूर्ण केलेला. त्या कार्यक्रमातले जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. जान्हवीनेसुद्धा काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले असून त्या फोटोंना तिने आइसी स्पाइसी असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांना जान्हवीच्या अदा खूप आवडल्या आहेत. डिझायनर मनीष मल्होत्रा, हेयरस्टाइलिस्ट अमित ठाकुर आणि अभिनेत्री आकांक्षा रंजननेसुद्धा जान्हवीच्या फोटोवर सुंदर अशी कमेंट केली आहे.

यूजर्सपण जान्हवीचे हे हॉट फोटो पाहून वेडे झाले आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये म्हटले की, कधी वाटलं नव्हतं एखादी व्यक्ती आपल्या सौंदर्याने माझी झोप उडवेल, तर एकाने लिहिले की, मला तुला सतत पाहतच राहवेसे वाटते, तर दुसऱ्याने लिहिले की, बर्फात पण आग लावलीस, माझं तापमान वाढवलंस.

काहींना जान्हवीचे फोटो खूप आवडले असले तरी काहींनी मात्र तिच्या फोटोला ट्रोल केले आहे. एका यूजरने जान्हवीच्या बॅकलेस ब्लाउजवरुन तिला ट्रोल करत तू आता दुसरी उर्फी जावेद होऊ नकोस असे म्हटले, तर आणखी एकाने साडी नेसता येत नसेल तर नेसतेस कशाला असे लिहिले आहे. तर दुसऱ्या यूजरने तुला पदर कसा घेतात हे माहित नाही का असा प्रश्न तिला विचारला आहे.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचा काही जुलैमध्ये गुड लक जेरी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. येत्या काळात ती मिली या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे हा तिच्या वडिलांसोबतचा पहिलाच चित्रपट आहे. याव्यतिरिक्त ती मिस्टर अॅण्ड मिसेस माही आणि बवाल या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे.