सैफशी लग्न केलस तर करीअर बरबाद होईल असे म्हणणाऱ...

सैफशी लग्न केलस तर करीअर बरबाद होईल असे म्हणणाऱ्यांना करीनाने दिले होते चोख उत्तर (‘Don’t Marry Saif Else Your Career Will be Ruined’, Know How kareena Kapoor Responded to These Taunts of People)

करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे नाव बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात रोमँटिक जोडप्यांमध्ये घेतले जाते. या दोघांची प्रेमकहाणीसुद्धा एकेकाळी चर्चेचा विषय होती. सैफने पहिले लग्न स्वत:हून 12 वर्षांनी मोठ्या अमृता सिंगसोबत केले होते. त्यानंतर तिच्याशी घटस्फोट झाल्यावर त्याने दुसरे लग्न स्वतःहून 10 वर्षांनी लहान असलेल्या करीना कपूरसोबत केले. सैफसोबत लिव्ह इनमध्ये राहून देखील त्याच्याशी लग्न करणे करीनासाठी सोपे नव्हते. अनेकांनी तिला सैफशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता.पण करीनाने ‘सैफशी लग्न करू नकोस नाहीतर तुझं करिअर बरबाद होईल’, असं म्हणणाऱ्यांना चोख उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली होती.

करीनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 ला झाला. आता ती 42 वर्षांची झाली आहे. करीनाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. 

2008 मध्ये टशन चित्रपटादरम्यान सैफ आणि करीनामधील जवळीक वाढू लागली होती. अनेक वर्षे डेटिंग आणि लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर अखेर 2012 मध्ये सैफ आणि करीनाने एकमेकांशी लग्नगाठ बांधली. सैफसोबत लग्न करण्याचा प्रवास करीनासाठी सोप्पा नव्हता. कारण अभिनेत्रीला तिच्या जवळच्या व्यक्तींनीच सैफशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता. करीनाने सैफशी लग्न केले तर तिचे फिल्मी करीअर बरबाद होईल असे त्यांना वाटायचे.

करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोक म्हणायचे की सैफशी लग्न करू नकोस नाहीतर तुझे करीअर बरबाद होईल. अभिनेत्रीच्या मते, लोकांच्या या विचारामागे दोन खास कारणे होती, एक म्हणजे सैफचा घटस्फोट झाला होता आणि दुसरे म्हणजे सैफला सारा अली खान आणि इब्राहिम खानही दोन मुलं होती. यासोबतच तो माझ्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठा आहे.

करीनाच्या मते, आपल्याला जे करायचे असते ते कोणत्याही परिस्थितीत करावे, आणि त्यावेळी तिला केवळ सैफशी लग्न करायचे होते.

 करिनाच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे लग्नाबाबत कोणतीही ब्ल्यू प्रिंट नव्हती किंवा तिने त्यासाठी कोणतेही विशेष नियोजन केले नव्हते, फक्त तिला लग्नाचा अंतिम निर्णय घ्यायचा होता, त्यामुळे लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत अभिनेत्रीने सैफ अली खानशी लग्न केले. या लग्नामुळे लोकांची बोलतीही बंद झाली.

लग्नानंतर करीना कपूरने तैमूर अली खान आणि जेह अली खान या दोन मुलांना जन्म दिला, तर सैफला त्याची पहिली पत्नी अमृता सिंगपासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. सैफचे पहिले लग्न तब्बल 13 वर्षांनंतर तुटले. त्यानंतर बऱ्याच काळानंतर सैफच्या आयुष्यात करीना आली.