कतरीना कैफने आपल्या वडीलांसोबतच्या नात्याचा केल...

कतरीना कैफने आपल्या वडीलांसोबतच्या नात्याचा केला खुलासा (Does Katrina Kaif Hate Her Father? Actress had Said This About Relationship with Him)

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरीना कैफ लग्नानंतर पती विकी कौशलसोबत आपले वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. कतरीना आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. कतरीना लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटात दिसणार आहे. कतरीना कैफ आणि तिच्या सर्व भावंडांचे पालनपोषण तिच्या आईनेच केले आहे हे बहुतेक लोकांना माहीत आहे. तिच्या आईवडिलांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता.त्यामुळे कतरीना तिच्या वडिलांचा तिरस्कार करते का असा प्रश्न अनेकांना पडतो. एकदा स्वतः अभिनेत्रीने आपल्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल बरेच काही सांगितले होते.

कतरीना सध्या वेगवेगळ्या दिवाळी पार्ट्यांमध्ये विकी कौशलसोबत सहभागी होत आहे. त्या दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

कतरीना कैफच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ होते, ते एक व्यापारी होते. मिळालेल्या माहितीनुसार कतरीना लहान असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर तिचे वडील कुटुंब सोडून अमेरिकेत गेले.

कतरीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, घटस्फोटानंतर तिच्या आईने तिचे आणि तिच्या भावंडांचे संगोपन केले आहे. वडिलांचा काहीच पत्ता नव्हता, की त्यांनी कधी आपल्या मुलांची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.

2009 मध्ये कॅटने एका मुलाखतीत खुलासा केला होता की मी माझ्या वडिलांच्या संपर्कात नाही किंवा माझे त्यांच्याशी कोणतेही नाते नाही. मी माझ्या वडिलांशी बोलत नाही. माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिने आम्हाला मुलांना केले त्यामुळेच आज प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात चांगले काम करत आहेत.

कतरीना कैफने आपल्या मेहनतीने इंडस्ट्रीत वेगळे स्थान मिळवले आहे. आता ती तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कतरीनाने विकी कौशलसोबत लग्न केले. ती तिच्या वैवाहिक जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियाबद्दल बोलायचे झाले तर इंस्टाग्रामवर तिचे जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहे, सुमारे 68 मिलियन लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.