तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितो?...
तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितो?… हे खरं आहे का? (Does Anil Kapoor Drinks Snake Blood To Look Young, Actor Reacts)

अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. त्याचा फिटनेस पाहिलं की जसजसं त्याचं वय वाढतंय तसा तो अधिक तरुण दिसत असल्याचं भासतं. अलिकडेच त्याच्या मुलीचं लग्न झालं. लग्नसमारंभातही अनिल कपूरचा स्टायलिश अंदाज पाहण्यासारखा होता. ६४ व्या वर्षीही त्याचा फिटनेस आणि एव्हरग्रीन लूक पाहून लोक अचंबित होतात. आपल्या चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी अनिल कपूर त्याचे वर्कआउट करतानाचे व्हिडिओज आणि पोस्ट शेअर करत असतो. बरेचदा तो त्याच्या फिटनेसमुळे चर्चिला जातो. त्याचे चाहते त्याच्या तरुणाईचं रहस्य जाणून घेण्यास इतके उत्सुक असतात की, त्या संदर्भातील कोणत्याही अफवांवर लगेच विश्वास ठेवतात. हे जाणून अनिल कपूरने काही अफवांचा खुलासा केला आहे.

अनिल कपूरने ट्रोलर्सची बोलती केली बंद
त्याचं असं घडलं की, अरबाज खानच्या ‘पिंच’ या टॉक शो मध्ये अनिल कपूरला बोलावण्यात आलं होतं. अरबाज खान या शोमध्ये येणाऱ्या सेलिब्रिटीसोबत सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगसंदर्भात चर्चा करतो. अनिल कपूरने देखील या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याच्या जीवनाशी निगडीत अनेक मजेदार प्रश्नांची उत्तरं दिली. काही नेटकऱ्यांचा असा समज आहे की, तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर सापाचं रक्त पितो आणि नेहमी प्लास्टिक सर्जनला आपल्यासोबत घेऊन फिरतो. त्यांचा हा समज अनिल कपूरने उत्तर देऊन दूर केला.
तरुण दिसण्यासाठी खरोखर अनिल कपूर सापाचं रक्त पितो का?

शोच्या एका सेगमेंटमध्ये अरबाजने अनिलला काही लोकांचे व्हिडिओज दाखवले, ज्यात अनिल कपूरच्या फिटनेस संदर्भात लोक विचित्र प्रश्न विचारताना दिसले. त्यात एकाने म्हटलंयं की, तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर नेहमी प्लास्टिक सर्जनला आपल्यासोबत घेऊन फिरतो. तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटलंय की तो सापाचं रक्त पितो.
मी आयुष्यात बरेच काही साध्य केले आहे, जे मला तरुण दिसण्यास मदत करते

सुरुवातीला अनिलचा लोकांच्या अशा बोलण्यावर विश्वास बसला नाही. त्याने अरबाजला विचारलेही की हे खरे आहेत की तुम्ही पैसे देऊन या लोकांना बोलावले आहे. अरबाजने सांगितले की, या कमेंट्स खऱ्या आहेत आणि लोकांना सत्य जाणून घ्यायचे आहे. यानंतर, या ट्रोलर्सना उत्तर देताना अनिल म्हणाला, ‘मी आयुष्यात बरेच काही साध्य केले आहे, त्यामुळे मला तरुण दिसण्यास मदत होते. देवाने मला वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिकदृष्ट्या आयुष्यात बरेच काही दिले आहे. प्रत्येकजण आयुष्यात चढ-उतारातून जातो, पण त्याबाबत मी भाग्यवान आहे. मला वाटते की प्रत्येकाकडे दिवसाचे २४ तास असतात त्यापैकी एक तास देखील जर आपण आपली काळजी घेऊ शकत नसल्यास काय फायदा?
देणाऱ्याने बहुत दिले…

एका नेटकऱ्याच्या प्रश्नावर उत्तर देताना अनिलने सांगितले की, ‘देणाऱ्याने बहुत दिले तुला, पण झोळीच छोटी पडली तर काय करायचे?’
चौसष्टाव्या वर्षीही चाहते अनिल कपूरच्या फिटनेसचे दिवा्ने आहेत. तर काही लोक त्याच्या शरीरावरील केसांवरून त्याची टेर खेचताना दिसले. त्यांनी त्याच्या बॉडी हेअरवर मीम्स बनवून पाठवले. ते पाहिल्यानंतर अनिलने आज मी तुमच्या शोसाठी मुंडन करून आलो आहे, असे म्हटले.
अनिल कपूर लवकरच ‘जुग-जुग जियो’ या चित्रपटात दिसेल, यात त्याच्यासोबत वरुण धवन, कियारा आडवाणी आणि नीतू कपूर दिसतील.