सलमान खानला पहिला पगार किती मिळाला होता, माहित ...

सलमान खानला पहिला पगार किती मिळाला होता, माहित आहे का? तोही ऍक्टिंगसाठी नाही, अन्य कामातून…. (Do You Know What Was Salman Khan’s First Salary? Not From Acting, He Earned Money By Some Other Work)

आता सलमान खानचा बॉलिवूडमध्ये भलताच दबदबा आहे. यश, प्रसिद्धी, पैसा जणू त्याच्या पायावर लोळण घेत आहेत. मात्र हे स्थान मिळविण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागली आहे. त्याला ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटात प्रथम पदर पदार्पणाची संधी मिळाली होती. जो १९८८ साली आला होता. पण तो त्यामध्ये दुसरा नायक होता. आज सलमानच्या खात्यावर किती तरी यशस्वी चित्रपट जमा आहेत. त्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, पण त्याला पहिला पगार, अथवा मानधन म्हणा हवं तर ते अक्टिंगसाठी नाही, तर डान्सिंगसाठी मिळालेला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सलमानने स्वतःच एका मुलाखतीत सांगितलं आहे की, त्याची पहिली कमाई फक्त ७५ रुपये होती. तीही डान्स करून मिळवली होती. मुंबईच्या ताजमहाल हॉटेलात कोणत्या तरी शो मध्ये डान्स करून ते पैसे मिळाले होते.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
त्याच बरोबर सलमान खानने सदर मुलाखतीत असाही उलगडा केला आहे की, ‘मैने प्यार किया’ या यशस्वी चित्रपटासाठी त्याला ३१ हजार रुपये मेहनताना मिळाला होता. या चित्रपटात तो खेळकर नायक झाला होता. तिथून त्याच्या करिअर ने इतका वेग पकडला की त्याची चलती झाली.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सलमान खान हा फिल्म इंडस्ट्रीतला नावाजलेला बॅचलर आहे, हे तर सगळेच जाणतात. त्याचे नाव बऱ्याच अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. पण तो अद्याप बिनलग्नाचा राहिला आहे.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
सलमानचे कित्येक शहरात घरे आहेत. पनवेलला मोठे फार्म हाऊस आहे. शिवाय तो बिईंग ह्यूमन या ब्रॅण्डचा मालक आहे. त्याचा ‘टायगर ३’ हा चित्रपट येऊ घातला आहे. अन ‘कभी ईद कभी दिवाली,’ व ‘पठाण’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.