बिग बॉस १६ मधील लोकप्रिय स्पर्धकांचे प्रत्येक ...

बिग बॉस १६ मधील लोकप्रिय स्पर्धकांचे प्रत्येक आठवड्यातील मानधन किती आहे माहीत आहे का? (Do You Know How Much Contestants In Bigg Boss 16 Earns Per Week)

सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. सध्या टीव्हीवर बिग बॉसचा १६वा सीझन सुरू आहे. बिग बॉस सीझन १६ चे काही लोकप्रिय स्पर्धक दर आठवड्याला किती पैसे कमावतात हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण बिग बॉस १६ च्या काही लोकप्रिय स्पर्धकांची मालमत्ता आणि त्यांचे प्रत्येक आठवड्याचे मानधन जाणून घेऊया.

बिग बॉस १६ ची प्रसिद्ध स्पर्धक अर्चना गौतम हिने काँग्रेसच्या तिकिटावर यूपी विधानसभा निवडणूक लढवली आहे. पण तिला पराभवाला सामोरे जावे लागले. २०२२ च्या निवडणुकीदरम्यान अर्चनाने सांगितले होते की तिच्याकडे सुमारे ३२ लाख रुपयांची संपत्ती आहे. बिग बॉस १६ ची लेडी डॉन अर्चना गौतम शोमध्ये दर आठवड्याला ३ लाख कमावत असल्याची माहिती आहे.

प्रियांका चहर चौधरी बिग बॉस १६ मध्ये चांगली खेळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चहर चौधरीची संपत्ती २० ते २५ कोटी रुपयांपर्यंत आहे. ‘उडारियां’ मालिकेतील अभिनेत्री प्रियंका चहर चौधरीला तिचे चाहते वाघिण म्हणतात. ती आठवड्याला ५ लाख कमवत आहे.

‘उडारियां’ या मालिकेत फताहची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता अंकितचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेता अंकित गुप्ताला बिग बॉस १६ मधून बाहेर काढण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंकितकडे जवळपास ४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंकित गुप्ता हा शोचा सायलेंट हिरो म्हणून ओळखला जात होता आणि तो शोमध्ये दर आठवड्याला ६-७ लाख रुपये घ्यायचा.

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान बिग बॉस १६चा भाग आहे. बिग बॉस १६ च्या एका सीनमध्ये त्याच्या एंट्रीवरून बराच गदारोळ झाला होता. चित्रपट निर्माता साजिद खानदेखील त्यांची एकूण संपत्ती ६५ कोटी रुपये आहे. साजिद खानने अखेर शोमध्ये आपला खेळ दाखवण्यास सुरुवात केली आहे. या शोमधून तो दर आठवड्याला सुमारे ५ लाख कमावतो.

बिग बॉस १६ मध्ये सलमानकडून अनेकदा ओरडा खाणारा अभिनेता शालीन भानोत याची एकूण संपत्ती १६ कोटींच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे. जबलपूरच्या शालीन भानोटने आपल्या करिअरची सुरुवात रोडीज या रिअॅलिटी शोमधून केली आणि हळूहळू टीव्ही शो करायला सुरुवात केली. नच बलियेसाठी जिंकल्यानंतर, त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आणि आता शालिन भानोत बिग बॉसचा भाग आहे. शालिन भानोतला बिग बॉसकडून  दर आठवड्याला ४ ते ५ लाख मिळतात.

टीव्ही मालिका छोटी सरदारनी फेम अभिनेत्री निम्रत कौर देखील या सीझनमध्ये सामील झाली आहे. शोमध्ये एंट्री घेऊन ती कॅप्टनही बनली आहे. वकील आणि सुंदर अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया तिच्या उदात्त वृत्तीने मनावर राज्य करत आहे. ही अभिनेत्री दर आठवड्याला ८ लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे.

सौंदर्या शर्मा ही बिग बॉसची सर्वात हॉट स्पर्धक आहे जिने बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. सौंदर्याला एका आठवड्यात  ४ लाख रुपये दिले जात आहेत. दंतचिकित्सक आणि अभिनेत्री सौंदर्या शर्मा तिच्या खेळाने चाहत्यांना प्रभावित करत आहे. बिग बॉसमध्ये ती दर आठवड्याला ३-४ लाख कमावते आहे.

बिग बॉस १६मधील टीना दत्ताचे घरामध्ये तिच्या विलक्षण स्वभावाने सर्वांचे मनोरंजन करत आहे. ती दर आठवड्याला सुमारे ८-९ लाख इतकी मोठी कमाई करत आहे. टीना दत्ता ही बिग बॉसची सर्वात लोकप्रिय स्पर्धक आहे.

अब्दु रोझिक बिग बॉस १६ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणून अब्दूचे नाव अग्रस्थानी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अब्दु रोजिक हा एक अतिशय मजेदार स्पर्धक आहे ज्याला बिग बॉस १६ मध्ये एका आठवड्यासाठी  ३ ते  ४लाख दिले जात आहेत.

सुंबूल तौकीर ही शोमधील सर्वात तरुण स्पर्धक आहे पण फीच्या बाबतीत ती आघाडीवर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीव्ही अभिनेत्री सुंबुल तौकीरची एकूण संपत्ती जवळपास ९ कोटी आहे.सुंबुल फक्त १९ वर्षांची आहे. रिपोर्ट्सनुसार, सुंबुल ही शोची सर्वात महागडी स्पर्धक आहे. ती दर आठवड्याला १२ लाख रुपये घेते.

‘बस्ती का हस्ती’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या रॅपर एमसी स्टॅनने घरातील आपला खेळ आणखीनच रंजक केला आहे. आपल्या गाण्याद्वारे त्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. स्टॅन दर आठवड्याला ७ लाख रुपये आकारत आहे.

बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे या सीझनमधील सर्वात मजबूत स्पर्धकांपैकी एक आहे. शिव दर आठवड्याला ५ लाखांची कमाई करतो.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)